AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त KL Rahul ला खेळवण्यासाठी टीम इंडिया आता ‘या’ खेळाडूचा बळी देणार?

KL Rahul News : मागच्यावेळी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. टीम इंडियाला यावेळी विजेतेपद मिळवण्यासाठी कुठलीही कसर ठेवायची नाहीय. पण त्यांच्यासमोर टीम निवडीचा प्रश्न आहे.

फक्त KL Rahul ला खेळवण्यासाठी टीम इंडिया आता 'या' खेळाडूचा बळी देणार?
kl rahul
| Updated on: Mar 15, 2023 | 9:12 AM
Share

KL Rahul News : टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जेतेपद मिळवण्यासाठी द ओव्हलमध्ये टीम इंडियाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मागच्यावेळी फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. टीम इंडियाला यावेळी विजेतेपद मिळवण्यासाठी कुठलीही कसर ठेवायची नाहीय. पण त्यांच्यासमोर टीम निवडीचा प्रश्न आहे.

केएल राहुल खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची टीममध्ये निवड झाली नाही. केएल राहुलने WTC फायनलमध्ये खेळावं, अशी टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक सुनील गावस्कर यांची इच्छा आहे.

त्याने संधी वाया घालवली

सुनील गावस्कर यांनी राहुलला WTC च्या फायनलमध्ये संधी देण्याची मागणी करतानाच त्याच्या रोलमध्ये बदलही सुचवला आहे. भारतीय टेस्ट टीमचा भाग असलेला ऋषभ पंत सध्या जखमी आहे. मागच्यावर्षी त्याच्या गाडीला अपघात झाला होता. त्यामुळे पंत पुढचे काही महिने क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीय. पंतच्या जागी केएस भरतला टीम इंडियात संधी मिळाली. पण तो स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही.

मग बाहेर कोणाला करायचं?

टीम मॅनेजमेंटने फायनलमध्ये केएस भरतला खेळवू नये, त्याच्याजागी केएल राहुलला संधी द्यावी, तो विकेटकीपिंगही करु शकतो, असं गावस्करांच म्हणणं आहे. राहुल वनडेमध्ये विकेटकीपिंग करतो. त्याशिवाय आयपीएलमध्येही त्याच्याकडे किपींग करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये त्याने कीपर म्हणून खेळावं, अशी गावस्करांची इच्छा आहे.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

“तुम्ही केएल राहुलला फक्त विकेटकीपर म्हणून खेळवू शकता. तो द ओव्हलवर 5 व्या किंवा 6 व्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला, तर आपली बॅटिंग अजून बळकट होईल. मागच्यावर्षी त्याने इंग्लंडमध्ये चांगली बॅटिंग केली होती. लॉर्ड्सवर शतक झळकवलं होतं. तुम्ही WTC च्या फायनलसाठी प्लेइंग 11 निवडताना केएल राहुलचा सुद्धा विचारा करावा” असं गावस्कर म्हणाले. ते स्पोर्ट्स तकवर बोलत होते. उपकर्णधार पदावरुन हटवलं

राहुल बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. तो टेस्ट टीमचा उपकर्णधार होता. बांग्लादेश दौऱ्यात रोहितच्या अनुपस्थितीत त्याने कॅप्टनशिपची जबाबदारी संभाळली होती. पण तो बॅटने फार काही करु शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात संधी मिळूनही तो फार काही करु शकला नाही. त्यानंतर पुढच्या दोन टेस्टसाठी टीमची निवड करण्यात आली, त्यावेळी तो टीममध्ये होता. पण त्याला उपकर्णधार पदावरुन हटवण्यात आलं.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...