
भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना दुबईत होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून होत्या. सामना होईल की नाही इथपासून सुरुवात झाली होती. पण या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल झाला आणि पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने तात्काळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण या मैदानात धावांचा पाठलाग करणं खूप कठीण जातं. दुसरीकडे, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या मनासारखं झालं. त्याने नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी घेतली असती असं म्हंटलं. कारण दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोलंदाजी करणं कठीण जाईल. असं सर्व घडत असताना सर्वांच्या सूर्यकुमारकडे लागून होत्या, सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी बोलतो की नाही? पण सूर्यकुमार यादवने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्याची नाणेफेकीवेळीच लायकी काढली.
सूर्कुमार यादवने नाणं वर उडवलं आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने प्रथम हेड असा कौल मागितला. कौल त्याच्या बाजूने लागला. त्याने फलंदाजी स्वीकारली पण यावेळी सूर्यकुमार हाताची घडी घालून होता. त्याने सलमान आघाकडे पाहिलं देखील नाही. सूर्यकुमार आणि टीम इंडियाच्या मनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याची सळ कायम आहे. सूर्यकुमार यादवने पंचांकडे संघाची यादी सोपवली. इतकंच काय तर समालोचकांशीही बोलला. पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
No Handshake Between Both Captain 🤝
Suryakumar Yadav Leading from the front 😎#SuryakumarYadav #INDvsPAK pic.twitter.com/EWJACh9i0t
— RoMan (@SkyXRohit1) September 14, 2025
आशिया कप स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व संघांचे कर्णधार एकत्र पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले होते. पण यावेळी सूर्याने तसे न करण्याचा निर्णय घेतला. आशिया कप असल्याने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारतीय संघाने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सामना खेळणं बंद केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ फक्त आशिया आणि आयसीसी स्पर्धेतच समोरासमोर येतात.