
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. स्कॉट एडवर्ड्स याच्याकडे नेदरलँड्सची सूत्रं आहेत. तर नजमूल हुसैन शांतो बांगलादेशचं कर्णधारपद सांभाळत आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार 8 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या व्यत्यामुळे तब्बल 30 मिनिट उशिराने रात्री 8 वाजता टॉस झाला. नेदरलँड्सने टॉस जिंकला. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.या सामन्याला 15 मिनिटांच्या विलंबाने 8 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना हा अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथे होत आहे. या स्टेडियममध्ये तब्बल 10 वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. तसेच नेदरलँड्स आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तसेच उभयसंघातील हा टी 20 क्रिकेटमधील एकूण पाचवा आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरा सामना आहे. बांगलादेशने एकूण 4 पैकी 3 सामने जिंकलेत. तर नेदरलँड्सला 1 सामना जिंकता आला आहे. तर बांगलादेशने नेदरलँड्स विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.
बांगलादेशने नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने आपल्यासह त्याच प्लेईंग ईलेव्हनवर विश्वास दाखवला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला नेदरलँड्सने बदल केला आहे. डच टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. तेजा निदामनुरु याच्या जागी आर्यन दत्त याचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान बांगलादेश आणि नेदरलँड्स दोन्ही संघ डी ग्रुपमध्ये आहेत. डी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मध्ये धडक मारली आहे. त्यामुळे बांगलादेश आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांसाठी सुपर 8 च्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नेदरलँड्सला बांगलादेश विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकदाही विजयी होता आलेलं नाही. त्यामुळे नेदरलँड्सकडे इतिहास रचण्याची संधी आहे. आता या प्रयत्नात विजय मिळवून नेदरलँड्स इतिहास रचते की बांगलादेश यशस्वी होते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, लोगान व्हॅन बीक, टिम प्रिंगल, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि विव्हियन किंगमा.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.