CAN vs UAE : युएईने कॅनडाला 5 विकेट राखून नमवलं, शेवटच्या दोन षटकात असा रंगला थरार

टी20 वर्ल्डकप गट ड मध्ये कॅनडा आणि युएई हे संघ आमनेसामने आले होते. या दोन्ही संघाची कामगिरी स्पर्धेत काही चांगली राहिली नाही. दोघांनी पहिला सामना गमावा होता. पण दुसऱ्या सामन्यात युएईने कॅनडाला 5 गडी राखून मात दिली.

CAN vs UAE : युएईने कॅनडाला 5 विकेट राखून नमवलं, शेवटच्या दोन षटकात असा रंगला थरार
CAN vs UAE : युएईने कॅनडाला 5 विकेट राखून नमवलं, शेवटच्या दोन षटकात असा रंगला थरार
Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 13, 2026 | 6:40 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 20व्या सामन्यात कॅनडा आणि युएई हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कॅनडाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात कॅनडाने 20 षटकात 7 गडी गमवून 150 धावा केल्या. तसेच विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना युएईची सुरुवातीला दमछाक झाली. कारण आघाडीचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले होते. त्यामुळे विजयाची बाजू पूर्णपणे कॅनडाच्या बाजूने झुकली होती. पण एका बाजूने आर्यांश शर्मा किल्ला लढवत होता. त्याला सोहेब खानची साथ मिळाली. आर्यांश शर्माने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूने सोहेब खान फटकेबाजी करत होता. त्यामळे शेवटच्या षटकांमध्ये सामना कधी येथे तर कधी त्या बाजूला झुकत होता.

शेवटच्या दोन षटकात काय झालं?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी युएईला 12 चेंडूत 26 धावांची गरज होती. तसेच हातात 6 विकेट होत्या. आर्यांश शर्मा आणि सोहेब खान ही जोडी जमली होती. त्यामुळे हे आव्हान शक्य आहे असंच वाटत होतं. कलीम साना हा कॅनडाकडून षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर आर्यांशने 2 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे 9 चेंडूत 16 अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि सोहेल खानला स्ट्राईक दिली. स्ट्राईकला आलेल्या सोहेल खानला नो बॉल टाकला. आणि फ्री हीट मिळाला. त्याने त्या चेंडूवर चौकार मारला आणि स्थिती 7 चेंडूत 10 धावा अशी आणली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढल्या आणि सोहेल खानने अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. तर 6 चेंडूत 8 धावा अशी स्थिती आली.

खेळपट्टीवर जम बसवलेला आर्यांश शर्मा स्ट्राईकला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि सामना आपल्या बाजूने खेचला. त्यामुळे 5 चेंडूत 2 धावा अशी स्थिती आली. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि सामना बरोबरीत आणला. 4 चेंडूत 1 धाव आवश्यक असताना सोहेल खान स्ट्राईकला आला. त्याने तिसऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि झेल बाद झाला. त्यामुळे सामन्यात ट्विस्ट आला. तीन चेंडूत 1 धाव अशी स्थिती असताना नवा फलंदाज स्ट्राईकला आला. मुहम्मद अरफान स्ट्राईकला आला आणि एक धाव काढली आणि हा सामना युएईने 5 गडी राखून जिंकला.