AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: पराभवानंतर रोहित शर्माच्या अश्रुंचा बांध फुटला, पहा VIDEO

IND vs ENG: त्यावेळी राहुल द्रविड शेजारी जाऊन बसले, आणि....

IND vs ENG: पराभवानंतर रोहित शर्माच्या अश्रुंचा बांध फुटला, पहा VIDEO
Rohit sharmaImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 10, 2022 | 6:38 PM
Share

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाचा प्रवास एका लज्जास्पद पराभवाने संपला. एडिलेडमध्ये सेमीफायनलचा सामना झाला. या मॅचमध्ये इंग्लंडने भारतावर 10 विकेटने विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाची 15 वर्षापासूनची प्रतिक्षा संपलेली नाही. भारताला 2007 पासून टी 20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवता आलेलं नाही.

या पराभवामुळे फॅन्सबरोबर रोहित शर्माही खूप निराश झाला. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रोहित शर्माची बॅट विशेष चालली नाही.

राहुल द्रविड शेजारी जाऊन बसले, आणि….

रोहित शर्माला पराभवानंतर स्वत:ला सावरण खूपच कठीण गेलं. तो डगआऊटमध्ये जाऊन एकटा बसला होता. कोणाशी काही बोलला नाही. खूप निराश झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी राहुल द्रविड त्याच्या शेजारी येऊन बसले. त्याच्याशी बोलले व त्याला संभाळण्याचा प्रयत्न केला. पण रोहितकडे पाहून तो स्वत:ला सावरण्याच्या स्थितीत वाटला नाही.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“मी खूप निराश आहे. आम्ही खूप मेहनतीने स्कोर उभा केला. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. नॉकआऊटच प्रेशर तुम्ही कसं संभाळता, त्यावर बरच काही अवलंबून असतं. शांत राहण्याची गरज होती. आम्ही सुरुवातीलाच घाबरत होतो. इंग्लंडच्या ओपनर्सना श्रेय द्याव लागेल” असं रोहित म्हणाला.

टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याकडून कोट्यवधी चाहत्यांना भरपूर अपेक्षा होत्या. पण नेहमी होतं, तसच घडलं. सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा अत्यंत दारुण पराभव झाला. इंग्लंडच्या टीमने मोठा विजय मिळवून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. आता रविवारी मेलबर्नवर इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल खेळली जाईल.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.