VIDEO : जिंकण्याची जिद्द संपली की, असं होतं, पाकिस्तान vs इंग्लंड सामन्यातील हे पहा उत्तम उदहारण

PAKW vs ENGW : या टुर्नामेंट पाकिस्तानचा खराब खेळ हा चर्चेचा विषय आहेच. पण काल पाकिस्तानच्या एका प्लेयरने मैदानात अशी चूक केली की, ते क्रिकेट विश्वात ते चेष्टेचा विषय बनलेत.

VIDEO : जिंकण्याची जिद्द संपली की, असं होतं, पाकिस्तान vs इंग्लंड सामन्यातील हे पहा उत्तम उदहारण
pakw vs engwImage Credit source: Screengrab
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 3:19 PM

PAKW vs ENGW : महिला T20 वर्ल्ड कपमध्ये काल पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला. इंग्लंडने पाकिस्तानचा मोठा पराभव केला. इंग्लंडने पाकिस्तानवर 114 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये धावांच्या हिशोबाने हा मोठा विजय आहे. या टुर्नामेंट पाकिस्तानचा खराब खेळ हा चर्चेचा विषय आहेच. पण काल पाकिस्तानच्या एका प्लेयरने मैदानात अशी चूक केली की, ते क्रिकेट विश्वात ते चेष्टेचा विषय बनलेत. पाकिस्तानी खेळाडू तुबा हसन इंग्लंड विरुद्ध बालिश पद्धतीने रनआऊट झाली. त्यानंतर तिच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय.

खांदे पा़डणं कितपत योग्य

घटना 19 व्या ओव्हरमधील आहे. तुबा हसनने डेवीसच्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्या दिशेने फटका मारला. चेंडू बाऊंड्री पार जाईल असं वाटलं. पण इंग्लिश फिल्डरने डाइव्ह मारुन चेंडू अडवला. त्यानंतर एलीस कॅप्सीने चेंडू थ्रो केला व तुबा हसन रनआऊट झाली. थ्रो नॉन स्ट्राइक एंडवर आला, त्यावेळी तुबा हसन क्रीजच्या दिशेने आरामात येत होती. तुबा हसनने आपला विकेट जाणुनबुजून दिलाय असं वाटलं. पाकिस्तानसाठी विजय अशक्य वाटत होता. पण एका आंतरराष्ट्रीय सामन्यात एखाद्या खेळाडूने अशा प्रकारे खांदे पा़डणं कितपत योग्य आहे. तिच्याकडे पाहून जणू ती जिंकण्याची जिद्द हरलीय असं वाटत होतं.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

पाकिस्तानचा मोठा पराभव

मॅचमध्ये पाकिस्तानची टीम कुठल्याही आघाडीवर इंग्लंडसमोर आव्हान निर्माण करु शकली नाही. पाकिस्तानच्या टीमला वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंडने पराभूत केलं. इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 213 धावा केल्या. नेट सिवरने 40 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. डॅनी व्याटने 33 चेंडूत 59 धावा फटकावल्या. पाकिस्तानी टीमने प्रत्युत्तरात 20 ओव्हर्समध्ये फक्त 99 धावा केल्या. सेमीफायनलचा लाइन अप निश्चित

पाकिस्तानची टीम बाहेर झाल्यानंतर आता सेमीफायनलचा लाइन-अप निश्चित झालाय. सेमीफायनलमध्ये गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना होणार आहे. दुसरा सेमीफायनल सामना शुक्रवारी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या टीममध्ये होईल. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि न्यूझीलंडची टीम आता मायदेशी परतणार आहे.

Non Stop LIVE Update
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.