AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये गेला नामिबियाचा खेळ खल्लास, काय केलं ते वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 24 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात रंगला. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसली. नामिबीयाला डोकंच वर काढू दिलं नाही. तसेच पॉवर प्लेमध्येच खेळ खल्लास करून टाकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे.

AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये गेला नामिबियाचा खेळ खल्लास, काय केलं ते वाचा
| Updated on: Jun 12, 2024 | 4:06 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाची अपेक्षेप्रमाणे कामगिरी सुरु आहे. साखळी फेरीतील पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीतील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाच्या चिंधड्या उडवल्या. सामन्यात वर येण्याची कुठेच संधी दिली नाही. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर नामिबीयाच्या फलंदाजांच काही एक चाललं नाही. एक एक करून फक्त मैदानात हजेरी लावून जात होते. नामिबीयाचा संपूर्ण संघ 17 षटकात 72 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 73 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 5.4 षटकात पूर्ण केलं. तसेच पॉवर प्लेमध्येच सामना संपवून टाकला. ओमाननंतर स्पर्धेतून बाद होणारा नामिबीया हा दुसरा संघ ठरला आहे.

नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मस हा एकमेव खेळाडू खेळला. कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली असं बोलायला हरकत नाही. गेरहार्डने 43 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. त्याला बाद करण्यात मार्कस स्टोइनिसला यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून एडम झाम्पाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याने 4 षटकात 12 धावा देत 4 गडी टिपले. तर जोश हेझलवूडने 2, मार्कस स्टोइनिसने 2, पॅट कमिन्सने 1 आणि नाथन एलिसने 1 गडी बाद केला.

ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने आक्रमक खेळीने सुरुवात केली. डेविड वॉर्नर दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनीच विजय मिळवून दिला. ट्रेव्हिस हेडने 17 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. तर मिचेल मार्शने 9 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 18 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

नामिबिया (प्लेइंग इलेव्हन): निकोलास डेव्हिन, मायकेल व्हॅन लिंजेन, जॅन फ्रायलिंक, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), डेव्हिड विसे, रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड शॉल्ट्ज, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.