T20 World Cup 2024 : सुपर 8 फेरीत दुसऱ्या संघाची एन्ट्री, तर इंग्लंड-स्कॉटलँडमध्ये चुरस

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात आले आहेत. तर सुपर 8 फेरीतील संघ आता निश्चित होताना दिसत आहेत. गट ब मधून दुसऱ्या संघाने सुपर 8 फेरीत एन्ट्री मारली आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे.

T20 World Cup 2024 : सुपर 8 फेरीत दुसऱ्या संघाची एन्ट्री, तर इंग्लंड-स्कॉटलँडमध्ये चुरस
| Updated on: Jun 12, 2024 | 3:42 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत धडक मारण्यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. एकूण चार गट असून अव्वल दोन स्थानी जागा मिळवण्यासाठी संघ कठोर परिश्रम करत आहेत. सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेनंतर अधिकृतरित्या ब गटातून एन्ट्री झाली आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड, नामिबिया, इंग्लंड आणि ओमान हे संघ आहेत. या गटातून तीन पैकी तीन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. सुपर 8 फेरीत धडक मारण्याचा पहिला मान ऑस्ट्रेलिया संघाला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाने ओमान, इंग्लंडनंतर नामिबियाला पराभूत केल आहे. यासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 6 गुण जमा झाले आहेत. या गटातून ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड हे दोन संघ सोडले तर कोणीही सहा गुण मिळवू शकत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं सुपर 8 फेरीचं तिकीट पक्कं झालं आहे. दुसरीकडे, या गटातून नामिबिया आणि ओमान हे दोन संघ बाद झाले आहेत. तर सुपर 8 फेरीत स्थान मिळवण्यासाठी स्कॉटलँड आणि इंग्लंडमध्ये चुरस आहे.

स्कॉटलँडचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. स्कॉटलँडने विजय मिळवला तर या गटातून सुपर 8 फेरीत स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरेल. पण पराभव झाला तर इंग्लंडच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागेल. इतकंच काय तर नेट रनरेटवर सर्वकाही ठरणार आहे. कारण स्कॉटलँडने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 1 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे स्कॉटलँडच्या खात्यात 5 गुण आहेत. तर इंग्लंडचं गणित मात्र किचकट आहे. इंग्लंडचे दोन सामने शिल्लक आहेत.

इंग्लंडला नामिबिया आणि ओमानसोबत सामने खेळायचे आहेत. सध्या इंग्लंडचा एका सामन्यात पराभव आणि दुसरा सामना ड्रॉ झाला. त्यामुळे इंग्लंडच्या पदरात फक्त 1 गुण आहे. असं असताना इंग्लंडने उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तरी 5 गुण होतील. अशावेळी स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यातील निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल. सध्या स्कॉटलँडचा नेट रनरेट +2.164 इतका आहे, तर इंग्लंडचा नेट रनरेट -1.800 इतका आहे.