SA vs IND Toss: टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिके विरुद्ध बॅटिंगचा निर्णय

South Africa vs India Final Toss: टीम इंडियाची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी तर दक्षिण आफ्रिकेची पहिली वेळ आहे.

SA vs IND Toss: टीम इंडियाने टॉस जिंकला, दक्षिण आफ्रिके विरुद्ध बॅटिंगचा निर्णय
ind vs sa t20 world cup
| Updated on: Jun 29, 2024 | 7:57 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया आमेनसामने आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेत अंजिक्य आहे. दक्षिण आफ्रिकेची वर्ल्ड कप अंतिम फेरीत पोहचण्याची पहिली वेळ आहे. तर टीम इंडिया तिसर्‍यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. महाअंतिम सामन्याचं आयोजन हे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही टीम अनचेंज

महाअंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मोठा निर्णय घेतला आहे.टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहित आण एडन या दोघांनी आपल्या त्याच प्लेइंग ईलेव्हनवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार, ही चर्चा फक्त चर्चाच ठरली आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ टी20आय क्रिकेटमध्ये एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. टीम इंडिया यामध्ये वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिका 11 वेळा यशस्वी ठरली आहे. तसेच टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांचा एकूण 6 वेळा आमनासामना झाला आहे. त्यापैकी टीम इंडियाने 4 तर दक्षिण आफ्रिकेने 2 वेळा विजय मिळवला आहे.

दोन्ही संघ अजिंक्य

दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दोन्ही संघ या टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अजिंक्य आहेत. टीम इंडियाने साखळी आणि सुपर 8 मधील प्रत्येकी 3 असे एकूण 6 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाचा साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेला. तर दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील 4 आणि सुपर 8 मधील 3 असे एकूण 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता आणखी एक सामना जिंकून वर्ल्ड कप कोण जिंकतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाने मोठा टॉस जिंकला

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.