ind vs eng semi final : सेमी फायनलमध्ये इंग्लंडला लोळवल्यानंतर कोणाला मिळालं बेस्ट फिल्डरचं मेडल? पाहा Video
ind vs eng best fielder : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमी फायनल सामन्यामध्ये भारताच्या शिलेदारांनी 68 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर टीम इंडियामधील कोणत्या खेळाडूला बेस्ट फिल्डर म्हणून गौरवण्यात आलं जाणून घ्या.

ICC T20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने इंग्लंड संघाचा पराभव करत फायनल गाठली. आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहिली असून आता फक्त आफ्रिकेचा पराभव आणि वर्ल्ड कपवर भारताचे शिलेदार नाव कोरणार आहेत. वर्ल्ड कप 2022 साली टीम इंडियाचा इंग्लंड संघाने १० विकेटने पराभव केला. टीम इंडियाने इंग्लंड संघाला ऑल आऊट करत आपल्या पराभवाचा बदला व्याजासकट वसूल केला. टीम मॅनेजमेंट प्रत्येक सामना झाल्यावर बेस्ट फिल्डरचा सामना झाल्यावर गौरव करते. इंग्लंडविरूद्धच्या सामन्यानंतर हे मेडल कोणत्या खेळाडूला मिळालं जाणून घ्या.
इंग्लंड संघ टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडकडून मैदानात जोस बटलर आणि साल्ट उतरले होते. दोघांनीही सावध सुरूवात केली होती. अर्शदीप आणि जसप्रीत बुमराह यांना सुरूवातीला काही यश आलं नाही. त्यानंतर रोहितने चाल चालली ती म्हणजे अक्षर पटेल याला ओव्हर दिली. अक्षरला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बटलरचा प्रयत्न फसला. बॅटची कट घेऊन चेंडू विकेटमागे हवेत उडाला. त्यावेळी कीपर रिषभ पंत याने शानदार कॅच घेतला. त्यानंतर खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या डावाला गळती लागली. साल्टला बुमराहने बोल्ड केलं, त्यानंतर रोहितने पुन्हा अक्षरकडे चेंडू सोपवला.
पाहा व्हिडीओ:-
📽️ 𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝘃𝘀 𝗘𝗻𝗴𝗹𝗮𝗻𝗱 | 𝗙𝗶𝗲𝗹𝗱𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗺𝗮𝘁𝗰𝗵
A sharp cricketing mind and a gem of a person presented the fielding medal 🏅 after the Semi-Final 😎
WATCH 🎥🔽 – By @RajalArora | #T20WorldCup | #TeamIndia | #INDvENG
— BCCI (@BCCI) June 28, 2024
अक्षर याने तीन ओव्हरमध्ये तीन ओव्हर टाकल्या, त्या तिन्ही ओव्हरमध्ये त्याने विकेट घेतल्या. बेअरस्टोला बोल्ड केलं त्यानंतर मोई अलीला पंतने प्रसंगावधान राखत स्टम्प आऊट केलं. मोईन अलीला आऊट करताना पंतची फिल्डिंग महत्त्वाची ठरली. इंग्लंडच्या डावाची इथूनच खरीग घसरगुंडी उडाली. त्यानंतक कुलदीप यादनने तीन विकेट घेत सामना टीम इंडियाच्या पारड्यात झुकवला.
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्य दिनेश कार्तिक आलेला पाहायला मिळाला. दिनेशने रिषभ पंतच्या नावाची घोषणा केली. यावेळी बोलताना त्याने रोहित शर्मा आणी कोच राहुल द्रविड यांचं कौतुक केलं. 2022 साली ज्यावेळी इंग्लंड संघाने टीम इंडियाला हरवलं होतं तेव्ह कार्तिकही टीमचा सदस्य राहिला होता.
