IND vs USA : भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात लागणार 3 निकाल, पाकिस्तानला बसणार धक्का?

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 25व्या सामन्यात भारत अमेरिका हे संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यावर अ गटातील इतर संघांचं लक्ष लागून आहे. कारण याच सामन्यावर सुपर 8 फेरीचं पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच उर्वरित तीन संघांची धाकधूक वाढली आहे. कारण हा सामना झालाच नाही तर...

IND vs USA : भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात लागणार 3 निकाल, पाकिस्तानला बसणार धक्का?
| Updated on: Jun 12, 2024 | 4:36 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. ही स्पर्धा आता हळूहळू पुढे सरकत असून सुपर 8 फेरीचं चित्र स्पष्ट होत आहे. दक्षिण अफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे, या स्पर्धेतील 25वा सामना भारत अमेरिका यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळणार हे पक्कं आहे. पण हा सामना पावसामुळे झालाचं नाही तर मात्र हे दोन्ही संघ सुपर 8 फेरीत जातील आणि इतर तीन संघांचा पत्ता कापला जाईल. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत पाकिस्तान सामन्यातही पावसाने तीन वेळा व्यत्यय आणला होता. पण खेळ थांबवत हा सामना 20 षटकांता पूर्ण झाला आणि भारताने बाजी मारली. दुसरीकडे, भारत अमेरिका या सामन्यात पाऊस पडला आणि सामना झालाच नाही तर मात्र पाकिस्तानसह आयर्लंड आणि कॅनडा सुपर 8 फेरीतून बाद होतील. हवामान खात्याच्या अहवालानुसार आजच्या सामन्यात पावसाची शक्यता आहे.

सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्याआधीच मैदान ओलं होण्याची शक्यात आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये वातावरणात 64 टक्के आर्द्रता असणार आहे. त्यामुळे या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द झाला तर पाकिस्तानचा संघ टी20 वर्ल्डकपमधून बाद होईल. कारण सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. भारत आणि अमेरिकेचे 5 गुण होतील. तर इतर तीन पाच गुण मिळवताच येणार नाहीत.

पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं गणित पूर्णत: भारतावर अवलंबून आहे. भारताने आजचा सामना जिंकला तर पाकिस्तानचा फायदा होईल. तसेच आयर्लंडविरुद्ध अमेरिकेने पराभूत व्हावं यासाठी प्रार्थना करावी लागेल. अमेरिकेचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तर चारच गुण राहतील. अशात पाकिस्तानला सुपर 8 फेरी गाठण्याची संधी मिळेल. पाकिस्तान आयर्लंडविरुद्धचा शेवटचा मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेटच्या आधारे सुपर 8 फेरीत प्रवेश करू शकतो.