AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या मराठमोळ्या गोलंदाजाने काढली विराट-रोहितची विकेट, कोहलीला खातंही खोलता आलं नाही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची चांगली सुरुवात झाली असली तरी दिग्ग खेळाडूंचा फॉर्म चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत उशिरा पोहोचलेल्या विराट कोहलीला अजूनही वातावरण काही मानवलेलं नाही. शेवटच्या वर्ल्डकप स्पर्धेत विराटच्या निराशाजनक कामगिरीचं दर्शन घडलं आहे.

अमेरिकेच्या मराठमोळ्या गोलंदाजाने काढली विराट-रोहितची विकेट, कोहलीला खातंही खोलता आलं नाही
| Updated on: Jun 12, 2024 | 10:25 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 25व्या सामन्यात भारत अमेरिका हे दोन संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 110 धावा केल्या आणि विजयासाठी 111 धावांचं आव्हान दिलं. या खेळपट्टीवर हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही याचा अंदाज भारत पाकिस्तान सामन्यात आला आहे. याची प्रचिती पहिल्याच षटकात भारताला आली. दिग्गज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणार रनमशिन्स विराट कोहली पुरता हतबल दिसला. आतापर्यंत फलंदाजीला पूरक असलेल्या मैदानात धावांचा वर्षाव करणारा विराट कोहली मात्र या मैदानात फेल झाल्याचं दिसला. आयर्लंडविरुद्ध 1, पाकिस्तानविरुद्ध 4 आणि आता अमेरिकेविरुद्ध त्याला खातंही खोलता आलं नाही. मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीवर त्याला आपलं एक धावही घेता आली नाही.

सौरभ नेत्रावळकरने विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. विकेटमागे अँद्रेस गौसने त्याचा झेल पकडला. त्यानंतर संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटकं टाकताना रोहित शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्माला चेंडू पडल्यानंतर समजलाच नाही आणि चूक करून बसला. हरमीतने त्याचा उत्तम झेल पकडला. त्यामुळे अमेरिकेने दिलेल्या धावा जरी कमी वाटत असल्या तरी त्या करणं वाटतं तितकं सोपं नाही. अवघ्या 10 धावांवर भारताचे दोन दिग्गज खेळाडू तंबूत परतले आहेत.

सौरभ नेत्रावळकर मुंबईकर असून त्याचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी मुंबईत झाला आहे. सौरभने आयसीसी अंडर-19विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळला आहे. सूर्यासोबत तो 15 वर्षांखालील रणजी आणि विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळला आहे. सौरभ त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आणि तिथेही क्रिकेट धडे गिरवणं काही सोडलं नाही. सौरभ सध्या ओराकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिकन संघाकडून खेळत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

युनायटेड स्टेट्स (प्लेइंग इलेव्हन): स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), एरॉन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावलकर, अली खान.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.