SL vs SA : आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयामुळे श्रीलंकेवर पराभवाची नामुष्की! झालं असं की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी केली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ फक्त 77 धावा करू शकला आणि दक्षिण अफ्रिकेने 6 गडी राखून पराभूत केलं होतं. पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार वानिंदु हसरंगा याने आयसीसीवरच बोट दाखवलं आहे. तसेच संघाच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

SL vs SA : आयसीसीच्या त्या निर्णयामुळे श्रीलंकेवर पराभवाची नामुष्की! झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 04, 2024 | 6:16 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. नाणेफेकीचा कौल जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी घेतली. पण संपूर्ण संघ 77 धावांवर तंबूत परतला. दक्षिण अफ्रिकेने हे लक्ष्य 4 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार वानिंदु हसरंगा खूपच नाराज दिसला. त्यानंतर अप्रत्यक्षरित्या आयसीसीवर या पराभवाचं खापर फोडलं. हसरंगाने या पराभवानंतर संघाच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लांबच्या प्रवासामुळे आम्हाला सराव सेशन रद्द करावे लागेल. इतकंच काय तर या वेळापत्रकामुळे संघावर नकारात्मक प्रभाव पडल्याचं फिरकीपटू महीश तीक्षणा याने सांगितलं आहे. या दोघांनी एका सुरात हा याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. “एकतर इतका लांबचा प्रवास करावा लागाला आणि आम्ही चार वेगवेगळ्या स्टेडियमध्ये सामने खेळणार आहोत.” श्रीलंकेचा पुढचा सामना 8 जूनला बांगलादेशसोबत आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता हा सामना होणार आहे. हा सामना टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर नेपाळ विरुद्ध 12 जूनला सामना होणार आहे. हा सामना सेंट्रल ब्रोवर्ड पार्कमध्ये होणार आहे. हे मैदान फ्लोरिडामध्ये आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार असून हा सामना बीउसेजोर क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. हे मैदाना सेट लुसियामध्ये आहे.

“श्रीलंका संगाने फ्लोरिडातून मियामीसाठी फ्लाईट पकडली आणि संघाला 8 तास विमानतळावर ताटकळत बसावं लागलं. श्रीलंका संघाला रात्री 8 वाजता निघायचं होतं. पण एअरपोर्टवर सकाळी पाच वाजता विमान मिळालं.” श्रीलंकन खेळाडूंनी सांगितलं की, भारताला न्यूयॉर्कमध्ये तीन सामने खेळायचे आहेत आणि दोन सामने खेळायचं आहेत. श्रीलंकन खेळाडूंची हॉटेलही न्यूयॉर्क स्टेडियमपासून खूपच दूर आहे.

तीक्षणाने सांगितलं की, ‘हॉटेलमधून मैदानात जाण्यासाठी 1 तासाचा अवधी लागतो. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सकाळी पाच वाजता उठावं लागलं. दुसऱ्या संघाचे हॉटेल मैदानापासून फक्त 14 मिनिटं लांब आहेत.’ मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकन व्यवस्थापनाने यासाठी आयसीसीला अर्ज लिहिला आहे. आयसीसी यावर नक्कीच तोडगा काढेल अशी आशा व्यवस्थापनाला आहे. मात्र तसं काही होईल असं वाटत नाही.

श्रीलंकेचा संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा (कर्णधार), महेश थेक्षाना, मथेशा पाथिराना, दिलशान मदुशांका, नुशान, डी सिल्वान, नुशान, डी. दुष्मंथा चमीरा, दुनिथ वेललागे.