IND Vs NAM: नामिबियाविरुद्ध टीम इंडियात 3 बदल! दोन खेळाडूंची चाचणी, तर एकाची जागा फिक्स होणार

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना दुबळ्या नामिबियासोबत होणार आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेने विजयासाठी चांगलंच झुंजवलं. त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. असं असताना टीम इंडियात तीन बदल केले जाणार असं दिसत आहे.

IND Vs NAM: नामिबियाविरुद्ध टीम इंडियात 3 बदल! दोन खेळाडूंची चाचणी, तर एकाची जागा फिक्स होणार
नामिबियाविरुद्ध टीम इंडियात 3 बदल! दोन खेळाडूंची चाचणी, तर एकाची जागा फिक्स होणार
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 10, 2026 | 8:09 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणि आता टीम इंडियात काही बदल झाले आहे. काही खेळाडूंचं नशिब फुटकं, तर काही जणांना नशिबाची साथ मिळाली आहे. हर्षित राणा स्पर्धेतून आऊट झाला आणि मोहम्मद सिराजला जागा मिळाली. तर संजू सॅमसन फॉर्मात नसल्याने इशान किशनला पसंती मिळाली. असं सर्व असताना नामिबियाविरूद्धच्या सामन्यात तीन बदल होण्याची शक्यता वाढली आहे. तीन पैकी दोन खेळाडूंची चाचणी परीक्षा असणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना नामिबियासाठी 12 फेब्रुवारीला दिल्लीत होणार आहे. रिपोर्टनुसार, या सामन्यात अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता कमीच आहे. कारण त्याला ताप आला आहे. त्यामुळे दिल्लीत टीम इंडियाच्या सराव शिबिरातही भाग घेतला नाही. अभिषेक शर्माच्या पोटात गडबड असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरावासाठी आला नाही. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रेयान टेन डेस्काथे यांनी याबाबत अपडेट दिली आहे.

टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक टेन डेस्काथे यांनी दिल्लीत मीडियाशी चर्चा करताना सांगितलं की, अजूनही दोन दिवसाचा अवधी शिल्लक आहे. आशा आहे की अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्धचा सामना खेळेल. त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं की, अभिषेक शर्माची तब्येत खराब आहे. त्यामुळे त्याचं दुसऱ्या सामन्यात खेळणं कठीण आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा काही खास करू शकला नव्हता. अमेरिकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता. त्याची जागा संजू सॅमसन घेण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळताच संजू आणि इशान ओपनिंगला उतरतील.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. त्यामुळे जर बुमराह फिट अँड फाईन असेल तर पुढच्या सामन्यात सामन्यात मोहम्मद सिराजला बसवलं जाईल. त्याने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. पण संघाच्या बांधणीत त्याचं कुठेच नाव नव्हतं. हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला म्हणून त्याला संघात जागा मिळाली. त्यामुळे अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोन पर्यायांना प्राधान्य दिलं जाईल.

वॉशिंग्टन सुंदरही संघात परतला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिंकु सिंहला बसवून अष्टपैलू म्हणून त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण रिंकु पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. वॉशिंग्टन सुंदरमुळे फलंदाजी आणि गोलंदाजीचा एक पर्याय असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us