T20 World Cup : अरे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आधी त्या दोघांना संघात घे, पॉटिंगचा गौतम गंभीरला सल्ला

गुरुवारी भारत आपला सुपर 8 मधील दुसरा सामना झिम्बाब्वेविरोधात खेळणार आहे. या सामन्यापूर्वी रिकी पॉटिंगने गौतम गंभीरला सल्ला दिला आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये आपन काय केलं असतं हे देखील सांगितलं आहे.

T20 World Cup : अरे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आधी त्या दोघांना संघात घे, पॉटिंगचा गौतम गंभीरला सल्ला
Potting, Gautam Gambhir
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 25, 2026 | 7:24 PM

सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 ची (T20 World Cup 2026) सुपर 8 फेरी सुरू आहे. सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केल्यामुळे आता भारत उपांत्य फेरीत पोहोचण्याचं समीकरण थोडं गुंतागुंतीचं झालं आहे. कारण भारताने उर्वरित आपले दोन्ही सामने जरी जिंकले तरी देखील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचं रनरेट हे खूप जास्त आहे. परंतु जर दक्षिण आफ्रिकेनं जर वेस्ट इंडीजचा पराभव केला आणि भारतानं आपले दोन्ही सामने जिंकले तर मग मात्र वेस्ट इंडीजचं आव्हान संपुष्टात येऊन भारत उपांत्य फेरीत धडक मारेल. दरम्यान आता सुपर 8 फेरीमध्ये गुरुवारी भारताचा सामना झिम्बाब्वे सोबत होणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा सामना असून, भारताला जर उपांत्य फेरीत पोहोचायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे. मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला एक खास सल्ला दिला आहे.

काय म्हटलं रिक पॉटिंगने?

रिकी पॉटिंगने गंभीरला सल्ला देताना म्हटलं आहे की, सध्या भारतावर दबाव आहे. त्यामुळे दबावाच्या अशा स्थितीमध्ये संघ निवडीसंदर्भात जास्त प्रयोग करण्यापेक्षा भारतीय संघातल्या सर्वोत्तम कामगिरी असलेल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला पाहिजे. आयसीसी रिव्हूमध्ये बोलताना रिकी पॉटिंगने गौतम गंभीरला हा सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना सध्या भारताकडून संघ निवडीमध्ये जे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत, त्यावर त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळलल्या गेलेल्या सामन्यात संघाचा उपकर्णधार अक्षर पटेल याला संघाच्या बाहेर बसवण्यात आलं होतं, तर त्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली होती, यावर बोलताना पॉटिंगने म्हटलं की, असा एखादा बदल तुमच्या संघाचं नशीब बदलू शकणार नाही.

जर मी त्या जागी असतो, तर संघामध्ये छोटे-मोठे बदल करण्याच्या राड्यामध्ये पडलो नसतो, परिस्थितीनुसार बेस्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली असती आणि त्यांच्यावरच विश्वास दाखवला असता, जर भारताला चेन्नईमधील न्यूझिलंडविरोधातील सामना जिंकायचा असेल तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना संघात खेळवणं अत्यंत गरजेच आहे, कारण भारताला जर जिंकायचं असेल तर त्यांना त्यांच्या गोलंदाजीची ताकद वाढवावी लागेल, असं यावेळी पॉटिंगने म्हटलं आहे.