T20 World Cup, Ind vs Aus Warm-up, Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा दुसरा सराव सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी - 20 विश्वचषकापूर्वीचा सराव सामना आज दुपारी दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवला जाणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

T20 World Cup, Ind vs Aus Warm-up, Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा दुसरा सराव सामना
Team India
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 12:16 PM

मुंबई : टी -20 विश्वचषकासाठी आपली तयारी आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात उतरेल. भारताला स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात रविवारी पाकिस्तानशी खेळायचे आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची ही शेवटची स्पर्धा आहे. हा सराव सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 पासून खेळवला जाईल. (T20 World Cup, know all details of Ind vs Aus Warm-up match Live Streaming, India vs Australia)

टीम इंडिया त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीची चाचणी घेईल. विराट ब्रिगेडसमोर दुसऱ्या आणि शेवटच्या सराव सामन्यात फलंदाजी क्रम निश्चित करण्याचे लक्ष्य आहे. इंग्लंडविरुद्ध सोमवारच्या सराव सामन्याआधी, कोहलीने म्हटले होते की, पहिले तीन क्रमांक निश्चित आहेत, केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली तर तो (कोहली) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारताला 7 विकेट्स राखून विजय मिळवता आला. या सामन्यात 45 चेंडूत आक्रमक 70 धावांची खेळी करणाऱ्या युवा इशान किशनने प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा दावा सिद्ध केला आहे. ऋषभ पंतला (नाबाद 29) फलंदाजी क्रमवारीत सूर्यकुमार यादवच्या वरचे स्थान मिळेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी – 20 विश्वचषकापूर्वीचा सराव सामना कधी खेळवला जाईल?

टी – 20 विश्वचषकातील टीम इंडियाचा दुसरा सराव सामना बुधवारी (20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना कोठे खेळवला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी -20 विश्वचषकापूर्वीचा सराव सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना कधी सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक तीन वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे होईल?

टीम इंडियाचा टी 20 विश्वचषक 2021 सराव सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग कोठे होईल?

या सराव सामन्यांचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलियन संघ: अॅरोन फिंच (कर्णधार), अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस, मिशेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोयनिस, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झांपा

इतर बातम्या

T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय

T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास

T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर

(T20 World Cup, know all details of Ind vs Aus Warm-up match Live Streaming, India vs Australia)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.