
यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पाकिस्तान टी 20i त्रिकोणी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत 5 सामन्यांनंतर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने सलग 3 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. तर श्रीलंकेने 27 नोव्हेंबरला पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर झिंबाब्वेला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं असतं. मात्र श्रीलंकेने पाकिस्तानवर 6 धावांनी मात करत ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. तर श्रीलंकेच्या या विजयामुळे झिंबाब्वेचं पॅकअप झालं. आता ही ट्रॉफी कोण जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही तासांमध्ये मिळणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. सलमान आघा अंतिम सामन्यात पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर दासुन शनाका याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना शनिवारी 29 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडयिममध्ये होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 6 वाजता टॉस होईल.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर स्पोर्ट्स टीव्ही या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.
दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेची या मालिकेत आमनेसामने येण्याची तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी झालेल्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोण मैदान मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.