
पाकिस्तानमध्ये टी 20I ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. या ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तान, झिंबाब्वे आणि श्रीलंका आमनेसामने आहेत. पाकिस्तानने सलग आणि एकूण 3 सामने जिंकून अंतिम फेरीत आधीच प्रवेश केला आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी झिंबाब्वे आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे. या मालिकेतील पाचव्या सामन्यात श्रीलंका-झिंबाब्वे आमनेसामने असणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 4-4 सामने खेळणार आहेत. श्रीलंकेचा हा तिसरा तर झिंबाब्वेचा चौथा सामना असणार आहे. झिंबाब्वेने या स्पर्धेत 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर श्रीलंकेला दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या तुलनेत झिंबाब्वेला अंतिम फेरीत पोहचण्याची संधी अधिक आहे. मात्र त्यासाठी झिंबाब्वेला श्रीलंकेला पराभूत करावं लागणार आहे. तर श्रीलंकेला अंतिम फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात चांगल्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे श्रीलंका-झिंबाब्वे यांच्यातील सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना मंगळवारी 25 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी इथे आयोजित करण्यात आला आहे.
श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 6 वाजता टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.
श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना मोबाईलवर स्पोर्ट्स टीव्ही या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहायला मिळेल.
सिंकदर रझा या सामन्यात झिंबाब्वेचं नेतृत्व करणार आहे. तर दासुन शनाका याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघाची या मालिकेत आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. झिंबाब्वेने याआधी 20 नोव्हेंबरला श्रीलंकेवर मात केली होती. त्यामुळे श्रीलंका आता मंगळवारी होणाऱ्या क्रिकेट सामन्यात विजय मिळवून या पराभवाची परतफेड करत अंतिम फेरीतील आव्हान कायम राखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.