AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : टीम इंडियासमोर सेमी फायनलसाठी 196 रन्सचं टार्गेट, विंडीज रोखणार?

India vs West Indies Super 8, 1st Innings Highlights : 2 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजने टीम इंडियासमोर कोलतकातामधील इडन गार्डन्समध्ये 196 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. आता हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये कोण पोहचतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs WI : टीम इंडियासमोर सेमी फायनलसाठी 196 रन्सचं टार्गेट, विंडीज रोखणार?
Team India and Roston Chase WI vs IND Super 8Image Credit source: Bcci and @windiescricket X Account
| Updated on: Mar 01, 2026 | 9:38 PM
Share

वेस्ट इंडिजने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात गतविजेता आणि यजमान टीम इंडियासमोर 196 धावांचं अवघड आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजच्या पहिल्या 6 फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 धावा केल्या. उभयसंघातील हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येत आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या दोघांपैकी  सेमी फायनलमध्ये पोहचणारा चौथा संघ कोणता असणार? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडीजच्या फलंदाजांनी पहिले बॅटिंग करण्याच्या संधीचा चांगला फायदा घेत 20 ओव्हरमध्ये 195 धावा उभारल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला जिंकायचं असेल तर 9.80 च्या रन रेटने धावा कराव्या लागणार आहेत.

विंडीजची बॅटिंग

विंडीजच्या पहिल्या 6 फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केली. या 6 पैकी एकानेही निराशा केली नाही. शाई होप आणि रोस्टन चेज या दोघांनी 68 धावांची सलामी भागीदारी केली. भारताने विंडीजला कॅप्टन होपच्या रुपात पहिला झटका दिला. होपने 32 रन्स केल्या. त्यानंतर चेज आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 16 बॉलमध्ये 34 रन्सची पार्टनरशीप केली. ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा जसप्रीत बुमराह याने निर्णायक क्षणी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला कमबॅक करुन दिलं. बुमराहने शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेज या सेट जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हेटमायरने 27 तर चेजने 40 रन्स केल्या.

त्यानंतर काही अंतराने टीम इंडियाने विंडीजला चौथा झटका दिला. हार्दिक पंड्या याने शेरफेन रुदरफोर्ड याला 14 रन्सवर विकेटकीपर संजू सॅमसन याच्या हाती कॅच आऊट केलं.त्यामुळे विंडीजचा स्कोअर 14.1 ओव्हरमध्ये 4 आऊट 119 अशी स्थिती झाली.

होल्डर-पॉवेलची निर्णायक भागीदारी

त्यानंतर जेसन होल्डर आणि रोवमॅन पॉवेल या जोडीने फटकेबाजी करत विंडीजला 20 ओव्हरमध्ये 195 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये 76 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. रोवमॅनने 34 आणि होल्डरने 37 रन्स केल्या. तर टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स मिळवल्या. तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती याने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार