भारतीय संघात कोरोनाची एन्ट्री, 2 खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी चिंता वाढल्या!

| Updated on: Jul 15, 2021 | 9:07 AM

भारतीय संघात कोरोनाने एन्ट्री मिळवलेली आहे. संघातल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. (team india 2 Player Corona Positive India tour of England)

भारतीय संघात कोरोनाची एन्ट्री, 2 खेळाडू पॉझिटिव्ह, इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेआधी चिंता वाढल्या!
टीम इंडिया
Follow us on

मुंबई : इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेआधी भारतीय संघाच्या (Team India Tour of England) चिंता वाढल्या आहेत. कारण भारतीय संघात कोरोनाने एन्ट्री मिळवलेली आहे. संघातल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलंय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर (WTC Final 2021) भारतीय संघाने प्रदीर्घ ब्रेक घेतला. जवळपास तीन आठवड्यांच्या या ब्रेकमध्ये खेळाडूंनी आपल्या कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये धमाल केली. याच दरम्यान संघातल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यातील एक खेळाडू रिकव्हर देखील झालाय तर दुसऱ्या खेळाडूला कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत.

दोन खेळाडूंना कोरोना, प्रकृती स्थिर

दोन्ही खेळाडूंना थंडी वाजणे, घशात खवखवणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणे होती. परंतु दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे. पहिल्या खेळाडूची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे तर दुसऱ्या खेळाडूची दुसरी कोरोना टेस्ट 18 जुलै रोजी केली जाणार आहे. मात्र संघातल्या नेमकी कुणाला कोरोनीची लागण झाली याची माहिती अद्याप आणखी समोर आलेली नाही. सध्या संबंधित प्लेयर आयसोलेशनमध्ये आहे. 18 तारखेला त्याचा आयसोलेशन मधील 10 वा दिवस असेल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगोलग तो भारतीय संघाच्या सोबत सराव करेल.

येत्या 20 तारखेपासून प्रॅक्टिस मॅचेस सुरु

इंग्लंडच्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघातल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली हा काही चिंतेचा विषय नाही. कारण बाकीचे सगळे खेळाडू नियमांचं पालन करत आहेत. तसेच वारंवार टेस्ट करत आहेत. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांची प्रकृती देखील आता स्थिर आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही चिंतेचा विषय नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. इंग्लंड विरुद्ध भारताच्या कसोटी मालिकेला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 4 ऑगस्ट रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामना खेळला जाणार आहे.

(team india 2 Player Corona Positive India tour of England)

हे ही वाचा :

पाकिस्तानच्या बाबर आजमचा नवा रेकॉर्ड, विराट कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

आर. आश्विनची कमाल, इंग्लंडमध्ये उडवतोय धमाल, 13 ओव्हरमध्ये केलं अर्ध्या संघाला बाद

Video : हरभजनच्या Baby Boy चे घरी पदार्पण, व्हिडीओ शेअर करत आई गीता बसराने साजरा केला आनंद