AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानच्या बाबर आजमचा नवा रेकॉर्ड, विराट कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे

बाबर आजमने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत अप्रतिम शतक ठोकलं. या शतकासोबतच एक नवा विक्रम करत त्याने विराट कोहली, हाशिम आमलासह अनेकांना मागे टाकलं आहे.

पाकिस्तानच्या बाबर आजमचा नवा रेकॉर्ड, विराट कोहलीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे
बाबर आझम आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 7:30 PM
Share

लंडन : पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्या एकदिवसीय क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमाकांवर असणारा  फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या रेकॉर्डमुळेच त्याने विराट कोहली (Virat Kohli), हाशिम अमला (Hashim Amla) अशा अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यात पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बाबरने हा विक्रम केला.

सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौैऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांसह तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील तीन एकदिवसीय सामने नुकतेच संपले असून तिन्ही सामन्यात पराभूत होत पाकिस्तानने मालिकाही गमावली आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात कर्णधार आझमने 139 चेंडूत 158 धावा ठोकल्या आणि याच शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 14 व्या शतकाची नोंद केली. बाबरने 81 व्या सामन्यातच हे शतक ठोकल्याने सर्वात कमी सामने खेळत 14 अर्धशतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने  हशिम आमला (84 सामने), डेव्हिड वॉर्नर (98 सामने), विराट कोहली (103 सामने) आणि क्वॉंटन डी कॉक (104 सामने) या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

मालिकेत व्हाईट वॉश

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली आहे. यातील पहिला एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सनी आणि दुसऱ्या सामन्यात 52 धावांनी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून व्हाईट वॉशपासून पाकिस्तानला वाचायचे होते. संघाने सुरुवातही चांगली केली बाबरच्या शतकासह पाकिस्तानने इंग्लंडसमोर 332 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इंग्लंडच्या जे विन्स याच्या शतकासह एल ग्रेगोरी याच्या 77 धावांच्या जोरावर इंग्लंडने 3 गडी राखून विजय मिळवला आणि सामन्यासह मालिकाही पाकिस्तानच्या हातातून गेली.

आर. आश्विनची कमाल, इंग्लंडमध्ये उडवतोय धमाल, 13 ओव्हरमध्ये केलं अर्ध्या संघाला बाद

ICC WTC23 : वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक जाहिर, ‘असे’ असतील टीम इंडियाचे सामने

‘हा’ भारतीय खेळाडू खेळतोय काउंटी क्रिकेट, सुट्ट्या मध्येच सोडून परतला मैदानावर, 25 ओव्हरमध्ये दिले केवळ 5 चौकार

(Pakistan Odi Captain Babar Azam becomes fastest batsman to score 14 odi centuries )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.