‘हा’ भारतीय खेळाडू खेळतोय काउंटी क्रिकेट, सुट्ट्या मध्येच सोडून परतला मैदानावर, 25 ओव्हरमध्ये दिले केवळ 5 चौकार

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभव पत्करल्यानंतर आता संघ इंग्लंड विरुद्धच्या 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेची वाट पाहत आहे. तत्पूर्वी एका भारतीयाने थेट काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे.

'हा' भारतीय खेळाडू खेळतोय काउंटी क्रिकेट, सुट्ट्या मध्येच सोडून परतला मैदानावर, 25 ओव्हरमध्ये दिले केवळ 5 चौकार
आर. आश्विन
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 5:27 PM

लंडन : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) न्यूझीलंडकडून (New Zealand) आठ विकेट्सने पराभूत झाला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (WTC) होण्यापासून थोडक्यात राहिला. या पराभवानंतर आता भारतीय संघ पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी आपली पहिली कसोटी मालिका इंग्लंडच्या भूमितच इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून या सामन्यांना सुरुवात होणार असल्याने तोवर विश्रांती म्हणून सर्व भारतीय संघ सुट्टीवर आहे. कोणी आपल्या फॅमिलीसोबत पार्कमध्ये फिरत आहे, तर कोणी फुटबॉल सामन्यांची मजा घेत आहे. पण भारताचा एक खेळाडू सुट्टी मध्येच सोडत मैैदानावर परतला असून तो इंग्लंडच्या प्रसिद्ध काउंटी क्रिकेटमध्ये सरे संघाकडून खेळत आहे. (Indian Cricketer R Ashwin Playing in County Cricket for Team Surrey)

हा खेळाडू म्हणजे भारतीय फिरकीपटू विभागाचा म्होरक्या रविचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) आहे. त्याने नुकताच सरे संघाकडून पहिला सामना खेळत समरसेट संघाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केलीय. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने तब्बल 28 ओव्हर टाकत एक विकेटही मिळवला. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केल्याने आश्विनने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाना पछाडून सोडलं. त्याने पहिल्या दोन सत्रांत 24 ओव्हरमध्ये पाच मेडन ओव्हर टाकत 58 रन दिले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात टॉम लॅमनबाय (42) याला बाद करत आश्विनने आपले काते खोलले. विशेष म्हणजे 11 वर्षांत पहिल्यांदाच इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये नव्या चेंडूने सुरुवात करणारा आश्विन पहिला खेळाडू ठरला.

25 ओव्हरपर्यंत दिले केवळ 5 चौकार

पहिल्या दिवशीच्या खेळात आश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत 25 ओव्हरपर्यंत भेदक गोलंदाजी केली. त्याने या 25 ओव्हरमध्ये केवळ 5 चौकारच दिले. WTC Final मध्ये भारताला धुळ चारलेल्या डेवन कॉन्वेविरोधात यावेळी आश्विनने अप्रतिम गोलंदाजी केली. इंग्लंड कसोटीआधी भारतीय खेळाडू कोणतेच सराव सामने खेळणार नाहीत. त्यामुळे सराव होण्याकरता बीसीसीआय आणि आश्विन यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बातचीत केल्यानंतर त्याला हे सामने खेळण्याची परवानगी मिळाली.

हे ही वाचा :

भारतीय महिलांना 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यश, दिर्घकाळापासूनची अपयशाची मालिका खंडित

India W vs England W, 2nd T20 : उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय महिला विजयी, इंग्लंडवर 8 धावांनी मात

अभूतपूर्व! हरलीनने टिपलेल्या झेलाचे मोदींकडूनही कौतुक, इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं अभिनंदन

(Indian Cricketer R Ashwin Playing in County Cricket for Team Surrey)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.