मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसरा (Geeta basra) यांनी 10 जुलैला एका बाळाला जन्म दिला. दोघेही दुसऱ्यांदा माता-पिता झाले असून त्यांनी याआधी 2016 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. हरभजनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हरभजनचं नवजात बाळ आणि पत्नी गीता घरी परतल्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयातून डिस्जार्ज दिल्यानंतर हरभजनची पत्नी गीता आणि बाळ यांचा घरी नेतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हरभजन, त्याची पत्नी गीता, मुलगी हीनाया आणि नुकतेच जन्मलेले बाळ दिसत आहेत. बाळाला बाबागाडीत बसवले असून सर्वांनी मास्क घातलेले आहेत.
View this post on Instagram
हरभजनती पत्नी आणि बाळाची आई गीता बसरा हिनेही तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘Born in 2021’ असं लिहिलेला एक नाईटसूट, टेडी बियर, फुगे अशी सारी तयारी करुन ठेवल्याचे दिसत आहे. सूटवर Baby Plaha असंही लिहिलं असून बाळाचे नाव अजून जाहिर केले नसल्याने या Baby Plaha चा काय अर्थ असावा असा विचार चाहते करत आहे.
View this post on Instagram
हे ही वाचा :
Good News : हरभजन सिंगच्या घरी नवा पाहुणा, दुसऱ्यांदा झाला पिता, इन्स्टाग्रामवरुन दिली आनंदाची बातमी
(Harbhajan Singh Takes his Wife Geeta Basra Newborn son home see photos and videos)