AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | विराट कोहली याच्याकडून बोलता बोलता स्वत:ची सचिन तेंडुलकर याच्यासोबत तुलना

विराट कोहली टीम इंडियाचा अनुभवी आणि घातक फलंदाज आहे. विराटने टीम इंडियाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत.

Virat Kohli | विराट कोहली याच्याकडून बोलता बोलता स्वत:ची सचिन तेंडुलकर याच्यासोबत तुलना
| Updated on: Feb 26, 2023 | 2:31 AM
Share

मुंबई | टीम इंडियाचा स्टार बॅटर विराट कोहली याची क्रिकेट विश्वात आघाडीच्या फलंदाजांमध्ये गणना होते. विराट याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेक मालिका जिंकल्या. मात्र दुर्देवाने विराट याला आपल्या नेतृत्वात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकून देता आली नाही. विराटने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बोलता बोलता विराट याने स्वत:ची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासोबत तुलना केली.

विराट आयपीएल टीम आरसीबीच्या पोडकास्टमध्ये बोलत होता. “हा सर्व दृष्टीकोनचा विषय आहे. मी एक खेळाडू म्हणून 2011 चा वर्ल्ड कप जिंकलोय. एक क्रिकेटर म्हणून चॅम्पियन ट्रॉफी जिंकलोय. मी त्या टीमचा भाग आहे, ज्या टीमने 5 टेस्ट गदा जिंकल्या आहेत. जर तुम्ही या नजरेनेच पाहत असाल, तर असेही अनेक खेळाडू आहेत ज्यांना वर्ल्ड कप विजेत्या संघाचं सदस्य होण्याचं भाग्यही लाभलं नाही. माझ्याकडे जे काही आहे, त्यासाठी मी आभारी आहे.”, असं विराट म्हणाला.

सचिन तेंडुलकर सोबत तुलना

विराटने या पॉडकास्टमध्ये बोलता बोलता सचिनसोबत स्वत:ची तुलना केली. विराट बोलला की सचिनला सहाव्या प्रयत्नात वर्ल्ड कप जिंकता आला. तर तो स्वत: पहिल्याच प्रयत्नात वर्ल्ड कप विनर टीमचा भाग बनला. “जर माझं चुकत नसेल, तर सचिन तेंडुलकर सहावा वर्ल्ड कप खेळत होते, तोच त्याने जिंकला. तर मी पहिल्यांदा टीमचा भाग होतो. मी सक्षम असल्याने टीमचा भाग झालो.”, असं विराटने नमूद केलं. मात्र विराटच्या या विधानाचे सोशल मीडियावर पडसाद पाहायला मिळाले. विराटच्या या वक्तव्यावरुन समिंश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

“माझ्या करियरमधील उणीवा काढायचं झालं तर ते फार सोपं आहे. पण मला ते पाहावं लागेल जे माझ्या करिअरमध्ये चांगलं घडलंय. त्यासाठी मी आभारी आहे. दररोज तुम्ही तुमच्या कामगिरीत किती बदल करता. किती वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीने खेळता, हाच माझ्यासाठी निकाल आहे.मी स्वत:शी याबाबत फार प्रामाणिक आहे”, असं विराटने नमूद केलं.

दरम्यान टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

विराटसाठी लकी मैदान

विराट कोहली याच्यासाठी होळकर स्टेडियम फार लकी ठरला आहे. विराटने या स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध 2016 साली 211 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळे या तिसऱ्या कसोटीतही क्रिकेट चाहत्यांना विराटकडून अशाच प्रकारची खेळी अपेक्षित असणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.