ENG vs IND : इंग्लंडहून भारतात परतला टीम इंडियाचा खेळाडू, कारण काय?

India Tour Of England 2025 : काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर कौटुंबिक कारणामुळे भारतात परतले होते. त्यानंतर आता टीम इंडियाचा फलंदाज मायदेशी परतला आहे. जाणून घ्या.

ENG vs IND : इंग्लंडहून भारतात परतला टीम इंडियाचा खेळाडू, कारण काय?
Washington sundar jasprit bumrah and sarfaraz khan
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 18, 2025 | 8:00 AM

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना हा 20 जून रोजी हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या एका स्टार आणि युवा खेळाडूने सोशल मीडियावर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या खेळाडूने इंग्लंड सोडलंय. हा खेळाडू नुकताच इंडिया ए टीमसाठी सिनिअर इंडिया विरुद्ध इन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये खेळला होता. मात्र हा खेळाडू इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळताना दिसणार नाही.

सर्फराजने इंग्लंड सोडलं

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सर्फराज खान याने इंग्लंड सोडलंय. सर्फराजने इंस्टाग्रामवरुन एक स्टोरी पोस्ट केली आहे. सर्फराजने त्या स्टोरीतून भारतात परतत असल्याची माहिती दिली आहे. सर्फराजने या स्टोरीत पासपोर्ट आणि बोर्डींग पासचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच सर्फराजने या स्टोरीत ‘मुंबई’ असं ठळक अक्षरात कॅप्शन दिलं आहे. “थँक्यू युके! यू वेअर एमेझिंग”, असंही सर्फराजने स्टोरीत नमूद केलंय.

सर्फराज खान इंडिया ए टीममध्ये होता. इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात आल्या. दोन्ही संघांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली. दोन्ही संघांना जिंकता आलं नाही. त्यामुळे मालिका 0-0 ने बरोबरीत राहिली. सर्फराजने इंग्लंड लायन्स विरुद्ध चमकदार खेळी केली. तसेच सर्फराजने इन्ट्रा स्क्वॉड मॅचमध्ये शतकही केलं. मात्र दुर्देवाने सर्फराजची कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. त्यामुळे सर्फराज इंग्लंडहून मायदेशी परतला आहे.

सर्फराजने इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर होण्याआधी जोरदार तयारी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्फराजने जवळपास 10 किलो वजन कमी केलं होतं. मात्र बीसीसीआय निवड समितीने सर्फराजचा विचार केला नाही.

सर्फराज खानची क्रिकेट कारकीर्द

सर्फराज खान याने गेल्या वर्षी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. सर्फराजला त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतही खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र सर्फराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तर आता इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा विचारही करण्यात आला नाही. सर्फराजने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. सर्फराजने या 6 सामन्यांमध्ये 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. सर्फराजने या दरम्यान 3 अर्धशतकं तर 1 शतक झळकावलं आहे.