Shikhar dhawan : दोन मुलांच्या आई बरोबर लग्न, आता तीच धवनला उद्‌ध्वस्त करायला निघाली?

Shikhar dhawan Divorce : धवनने प्रत्येक इंटरव्यू आणि महत्त्वाच्या प्रसंगी पत्नी आयेशाला यशाच श्रेय दिलं. आयपीएल असो, वा ऑस्ट्रेलिया. प्रेक्षक स्टँडमध्ये आयेशा नेहमी दिसायची. दोघांनी लव्हस्टोरी चांगलीच बहरली. अनेकांसाठी हे जोडप आदर्श होतं.

Shikhar dhawan : दोन मुलांच्या आई बरोबर  लग्न, आता तीच  धवनला उद्‌ध्वस्त करायला निघाली?
shikhar dhawan ayesha mukherjee
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 2:05 PM

Shikhar dhawan Divorce : वर्ष 2010 मध्ये शिखर धवनला टीम इंडियाकडून डेब्युची संधी मिळाली. पण सुरुवात फार चांगली नव्हती. त्यानंतर 2012 साली शिखर धवनच आयेश मुखर्जीबरोबर लग्न झालं. आयेशा आयुष्यात येताच शिखरसाठी सर्वकाही बदलून गेलं. त्याचे चांगले दिवस सुरु झाले. धवन टीममध्ये गब्बर बनला. रोहित शर्मासोबत त्याची सलामीची जोडी पक्की झाली. 2013 साली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर शिखर धवनने हळूहळून सर्व फॉर्मेटमध्ये आपलं स्थान पक्क केलं. धवनने प्रत्येक इंटरव्यू आणि महत्त्वाच्या प्रसंगी पत्नी आयेशाला यशाच श्रेय दिलं. आयपीएल असो, वा ऑस्ट्रेलिया. प्रेक्षक स्टँडमध्ये आयेशा नेहमी दिसायची. दोघांनी लव्हस्टोरी चांगलीच बहरली. अनेकांसाठी हे जोडप आदर्श होतं. सुखाने संसार चाललेला. पण आता सर्वकाही बदलून गेलय.

लव्ह स्टोरीत हरभजन सिंगचा महत्त्वाचा रोल

आयेश धवनला भेटली, तेव्हा तिचं पहिलं लग्न झालेलं होतं. तिने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली होत्या. दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये टीम इंडियाचा खेळाडू हरभजन सिंगचा महत्त्वाचा रोल होता. धवनने हरभजनच्या फेसबुक प्रोफाईलवर आयेशाचा फोटो पाहिला. त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघांमध्ये फेसबुकवर बोलणं सुरु झाली. डेटिंग सुरु झालं. आयेश फक्त दोन मुलीची आईच नव्हती, तर ती धवनपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. वयामध्ये एवढ अंतर असूनही दोघांनी लग्न केलं.

वडिलांच्या मायेने प्रेम दिलं

वर्ष 2009 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. 2012 मध्ये लग्न केलं. धवनने आय़ेशाच्या दोन्ही मुलींना वडिलांच्या मायेने प्रेम दिलं. या दरम्यान धवन आणि आयेशाचा मुलगा जोरावरचा जन्म झाला. वर्ष 2021 पर्यंत ही परफेक्ट लव्हस्टोरी होती. पण त्यानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

निकालात काय म्हटलय?

वर्ष 2021 मध्ये आयेशाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन दुसऱ्यांदा घटस्फोट घेत असल्याच सांगितलं. मागच्यावर्षी धवनने कोर्टात याचिका दाखल केली होती. आयेशा आपलं करिअर बर्बाद करण्यासाठी सोशल मीडियावर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवेतय अशी तक्रार शिखर धवनने केली होती. यावर आता कोर्टाने धवनला अपेक्षित आदेश दिलाय. कोर्टाने आयेशाला अशा गोष्टी करु नकोस, म्हणून ताकीद दिली आहे. एका व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा खूप प्रिय असते. ती त्याच्यासाठी संपत्ती असते. एखादी प्रॉपर्टी नुकसानीनंतर परत मिळवता येऊ शकते. पण इज्जतची अप्रतिष्ठा परत मिळवता येत नाही असं न्यायाधीश हरीश कुमार म्हणाले. आयेशा धवनसाठी लकी होती का?

सध्या धवनच्या व्यक्तीगत आयुष्यात वादळ आलय. त्याचवेळी त्याच करिअरही उतरणीला आहे. वनडे टीममधील त्याच स्थान धोक्यात आलय. यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी त्याला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. आयेशा आयुष्यातून गेल्यानंतर धवनची टीम इंडियातील स्थानही जवळपास गेल्यात जमा आहे.

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.