
MI IPL 2024 | मुंबई इंडियन्सची टीम IPL 2024 च्या सीजनसाठी तयारी करतेय. अलीकडेच या टीमच्या एका निर्णयाने सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसला. हा निर्णय घेण सोप नव्हतं. पण मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने हा कठोर निर्णय घेतला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कॅप्टन रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवलं. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपदाला गवसणी घातलीय. पण मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने अखेर रोहितला हटवण्याचा निर्णय घेतला. त्याच्याजागी हार्दिक पांड्याची कॅप्टनशिपपदी नियुक्ती केली. ट्रॅक रेकॉर्ड पाहूनच हार्दिकला मुंबई इंडियन्स कॅप्टन बनवलय. हार्दिक पांड्या आधी मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. पण 2022 मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने रिलीज केलं. त्यावेळी हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सने विकत घेतलं. टीमच कॅप्टन बनवलं.
हार्दिक पांड्याने सुद्धा आपले नेतृत्वगुण सिद्ध केलं. त्याच्या कॅप्टनशिपखाली गुजरात टायटन्सने पदार्पणात आयपीएलच विजेतेपद मिळवलं. यावर्षी सुद्धा गुजरातने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण त्यांना शेवटच्या चेंडूवर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केलं. त्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. हार्दिक पांड्याने आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी त्याची निवड करण्यात आलीय. मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय अनेकांना पटलेला नाही. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. रोहितला कॅप्टनशिपवरुन हटवताच सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्सची संख्या बरीच कमी झाली. पण टीम मॅनेजमेंटने भविष्य आणि संघ हिताचा विचार करुनच हा निर्णय घेतलाय.
मुंबई इंडियन्सच्या कुठल्या प्लेयरवर सर्वाधिक भरवसा?
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामते सध्या मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सूर्यकुमार यादव असा एकमेव फलंदाज आहे, ज्याच्या फलंदाजीवर भरवसा ठेवता येईल. “मुंबई इंडियन्सने मोठी रक्कम मोजण्याआधी इशान किशन ज्या फॉर्ममध्ये होता, आता तो तसाच खेळतोय. टीम डेविड कायरने पोलार्डची जागा भरुन काढण्याचा प्रयत्न करतोय. फॉर्मचा विचार केल्यास तुम्ही सूर्यकुमार यादववर अवलंबून राहू शकता” असं संजय मांजरेकर हॉटस्टारवर कॉमेंट्री करताना म्हणाले.
रोहितबद्दल काय मत?
“माझ्या दृष्टीने फलंदाज म्हणून रोहित शर्माबद्दल T20 क्रिकेटमध्ये प्रश्नचिन्ह आहे. 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, आशा दाखवली. पण तो एक वेगळा फॉर्मेट होता. तुम्हाला माहित होतं, हातात 50 ओव्हर्स आहेत. त्याने त्या पद्धतीने फलंदाजी केली. 50 ओव्हर्समध्ये बॉलर्सही वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी करतात” असं संजय मांजरेकर म्हणाले.