AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | ‘या’ भारतीय खेळाडूच करिअर धोक्यात, आज फ्लॉप झाल्यास सगळं संपल्यात जमा

IND vs SA 3rd ODI | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यानंतर टीम इंडिया पुढचे काही महिने या फॉर्मेटमध्ये खेळणार नाही. पुढच्यावर्षी T20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळे टी 20 सामन्यांवर टीम इंडियाचा भर असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियातील एका खेळाडूला आज शेवटची संधी असेल.

IND vs SA | 'या' भारतीय खेळाडूच करिअर धोक्यात, आज फ्लॉप झाल्यास सगळं संपल्यात जमा
IND vs SA ODI SeriesImage Credit source: AFP
| Updated on: Dec 21, 2023 | 10:58 AM
Share

IND vs SA 3rd ODI | भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 3 सामन्यांची वनडे सीरीज सुरु आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेला 8 विकेटने हरवलं. टीम इंडियाने अगदी सहज विजय मिळवला. पुढच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने उत्तर दिलं. त्यांनी टीम इंडियाला 8 विकेटने हरवलं. आता सीरीजमधील शेवटचा निर्णायक सामना होणार आहे. त्यानंतर पुढचे काही महिने टीम इंडिया वनडे खेळणार नाही. अशावेळी हा सामना एका खेळाडूसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना कदाचित त्याच्यासाठी शेवटची संधी असू शकतो. या प्लेयरच नाव आहे संजू सॅमसन.

मंगळवारी दुबईत आयपीएल 2024 च्या सीजनसाठी खेळाडूंच ऑक्शन सुरु होतं. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने अशा काही खेळाडूंना विकत घेतलं की, ज्यांच्यामुळे पुढच्या सीजनमध्ये टीम अधिक मजबूत होईल. मार्चपासून नवीन सीजन सुरु होईल, त्यावेळी टीमचा कॅप्टन संजू सॅमसनकडे एक मजबूत संघ असेल. पण IPL च्या आधी सॅमसन आपलं इंटरनॅशनल करिअर वाचवण्याच्या टेन्शनमध्ये आहे. जे T20 लीगआधी संपू शकतं.

पहिल्या दोन वनडेत कसा परफॉर्मन्स?

जोहान्सबर्गमध्ये पहिल्या वनडे सामन्यात संजू सॅमसनला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्यात मोठी इनिंग खेळून आपला दावा अधिक मजबूत करण्याची त्याच्याकडे संधी होती. 27 व्या ओव्हरमध्ये तिसरा विकेट गेल्यानंतर सॅमसन क्रीजवर आला होता. सॅमसनकडे बराचवेळ होता. पण आपल्या संपूर्ण करिअरप्रमाणे तो पुन्हा एकदा ही संधी साधण्यात अपयशी ठरला. जवळपास 5 ओव्हर खेळपट्टिवर राहिला. त्यानंतर 23 चेंडूत 12 धावा करुन पॅव्हेलियनची वाट धरली.

कुठले खेळाडू दरवाजा ठोठावतायत?

आता गुरुवारी 21 डिसेंबरला पार्लमध्ये सीरीजमधला शेवटचा सामना खेळला जाणार आहे. सॅमसनकडे टीममधील आपल स्थान शाबूत राखण्याची ही शेवटची संधी आहे. टीममध्ये सूर्यकुमार यादव, इशान किशन सारखे खेळाडू आहेत. तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि साई सुदर्शन सुद्धा दरवाजा ठोठावतायत. त्यामुळे सॅमसनला खास परफॉर्मन्स द्यावा लागेल.

त्याला सलग संधी नाही मिळाली

सॅमसनने 2015 साली T20 फॉर्मेटमधून इंटरनॅशनल डेब्यु केला होता. पण तो मोठा पल्ला गाठू शकला नाही. त्याला सलग संधी मिळाली नाही, असं बोलल जात. एक-दोन चान्सनंतर त्याला टीममधून बऱ्याचदा ड्रॉप केलं गेलं. मागच्या दोन-तीन वर्षात त्याला इतकी संधी मिळाली नाही.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.