AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याआधी वाईट बातमी, रोहित शर्माला मोठा धक्का

टीम इंडिया सध्या न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना हा शनिवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड दुसऱ्या सामन्याआधी वाईट बातमी, रोहित शर्माला मोठा धक्का
| Updated on: Jan 20, 2023 | 2:38 AM
Share

मुंबई : टीम इंडिया सध्या न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला श्रीलंका विरुद्ध मालिका विजय मिळवून दिला. त्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम राखण्याची संधी आहे. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना हा शनिवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी कॅप्टन रोहित शर्मासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

एका रिपोर्टनुसार, रोहित आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 पर्यंतच नेतृत्व करेल. त्यानंतर रोहित कर्णधार नसेल. तर उपकर्णधार असलेला हार्दिक पांड्या हा नेतृत्वाची जबाबदारी सांभाळेल. तसेच आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पांड्या कॅप्टन्सी करेल, असंही म्हटलं आहे.

इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा 2023 पर्यंत कॅप्टन्सी करेल. बीसीसीआयला आशा आहे की रोहित कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करेल. मात्र त्याबाबतचा निर्णय हा वनडे वर्ल्ड कपनंतर घेतला जाईल. या दरम्यान केएल राहुल कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

“रोहित या वर्षी टीम इंडियाचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. आम्हाला भविष्यात काय करायचंय हे ठरवायला हवं. पुढचा कर्णधार कोण असेल, फक्त काही होण्याची वाट पाहू शकत नाहीत. मी यावर तेव्हाच काही प्रतिक्रिया देऊ शकतो. जर रोहितने 2023 वर्ल्ड कपनंतर वनडे कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला, तर आम्हाला रणनिती करावी लागेल”, असं या बीसीसीआय अधिकाऱ्याने या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

“तसेच हार्दिक कर्णधार म्हणून चांगली भूमिका बजावतोय. तो तरुण आहे, तसेच भविष्यातही चांगली कामगिरी करेल. आता रोहितनंतर तरी कर्णधार म्हणून पांड्याशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय नाहीच. पांड्याला सपोर्ट करायला हवा”, असंही अधिकाऱ्याने म्हटलं.

दरम्यान टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध 21 जानेवारीला दुसरा एकदिवीय सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसाठी हा ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.