Yashasvi Jaiswal : गुपचूप-गुपचूप, यशस्वी इंग्लंड दौऱ्यानंतर या तरुणीसोबत थेट फ्रांसमध्ये! फोटो व्हायरल

Yashasvi Jaiswal France : इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारताचे जवळपास सर्वच खेळाडू मायदेशी परतले. मात्र यशस्वी जैस्वाल भारतात न येता थेट फ्रांसमध्ये धमाल मस्ती करत आहे. यशस्वीने सोशल मीडियावर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. पाहा.

Yashasvi Jaiswal : गुपचूप-गुपचूप, यशस्वी इंग्लंड दौऱ्यानंतर या तरुणीसोबत थेट फ्रांसमध्ये!  फोटो व्हायरल
Yashasvi Jaiswal Indian Cricket Team
Image Credit source: Bcci
Updated on: Aug 13, 2025 | 9:37 PM

भारताचा युवा आणि सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत आपली भूमिका चोखपणे पार पाडली. भारताने ही मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशी परतले. मात्र यशस्वी अजूनही भारतात परतलेला नाही. यशस्वी फ्रांसमध्ये सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वी फ्रांसमध्ये एका तरुणीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ही तरुणी यशस्वीच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित असते. यशस्वीने ओव्हलमधील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात शतक ठोकलं होतं. यशस्वीने या शतकानंतर जल्लोष करताना तरुणीकडे पाहत खास इशारा केल्याचा दावाही केला जात होता.

ती तरुणी कोण?

यशस्वी आणि इंग्लंडची मॅडी हॅमिल्टन या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. सध्या यशस्वी आणि मॅडी हे दोघे सध्या फ्रांसमधील पॅरिसमध्ये मजामस्ती करत आहेत. यशस्वीने इंस्टाग्रामवर त्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत यशस्वीसह मॅडी नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वी आणि मॅडी दोघेही पॅरिसमध्ये एकत्र असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच दोघेही एकमेकांना गेल्या 2-3 वर्षांपासून डेट करत असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

कोण आहे मॅडी हॅमिल्टन?

मॅडी ही न्यूट्रिशन एक्सपर्ट आहे. मॅडी इंस्टाग्रामवर फार एक्टीव्ह असते. मॅडीचं मॅडीजन्यू्री या नावाने इंस्टा पेज आहे. मॅडी या पेजद्वारे डायट संदर्भात पोस्ट करत असते. तसेच मॅडीचा भाऊ हेनरी आणि यशस्वी दोघेही चांगले मित्र आहेत. हेनरीने 2018 साली यशस्वीसोबत पहिल्यांदा फोटो पोस्ट केला होता. यावरुन हे दोघे किती घट्ट मित्र आहेत, हे सिद्ध होतं.

यशस्वीची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी

यशस्वीने इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांमधील 10 डावांमध्ये 41.10 च्या सरासरीने एकूण 411 धावा केल्या. यशस्वीने या दरम्यान 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली.

यशस्वीचा फ्रांस दौरा

आशिया कपमधून डच्चू!

दरम्यान इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 3-3 सामने खेळायचे आहेत. भारतीय संघाची ऑगस्टमधील चौथ्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. यशस्वीला आशिया कप स्पर्धेत स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र त्यानंतरही निवड समिती यशस्वीबाबत काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.