शुबमनचा डबल सेंच्युरीसह अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, गिल अशी कामगिरी एकमेव फलंदाज

Shubman Gill Double Century World Record : शुबमन गिल याने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवशी द्विशतक करुन असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. शुबमनने या द्विशतकासह एक वर्ल्ड रेकॉर्डही सेट केला आहे.

शुबमनचा डबल सेंच्युरीसह अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड, गिल अशी कामगिरी एकमेव फलंदाज
Shubman Gill Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Jul 04, 2025 | 9:40 PM

भारतीय कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही धमाकेदार बॅटिंग करणं सुरु ठेवलं आहे. शुबमनने इंग्लंडच्या गोलंदाजांना आतापर्यंत जेरीस आणलं आहे. शुबमनसमोर इंग्लंडचे अनेक गोलंदाज निष्प्रभ ठरले. शुबमनने इंग्लंड विरुद्ध लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 147 धावांची खेळी केली. त्यानंतर शुबमनने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी इतिहास घडवला. शुबमनने 269 धावांची विक्रमी खेळी साकारली. शुबमनने या दरम्यान 200 धावा पूर्ण करताच अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

शुबमनने कसोटी कारकीर्दीत इंग्लंड विरुद्ध केलेलं हे पहिलंवहिलं द्विशतक ठरलं. शुबमनने याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्येही द्विशतक ठोकलं आहे. शुबमनने 2023 साली न्यूझीलंड विरुद्ध झंझावाती 208 धावा केल्या होत्या. शुबमनच्या नावावर आता वनडे आणि टेस्ट दोन्ही फॉर्मटेमध्ये द्विशतकांची नोंद झाली आहे. शुबमनआधी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि ख्रिस गेल या चौघांनी एकदिवसीय-कसोटी या दोन्ही फॉर्मेटमध्ये द्विशतक करण्याची कामगिरी केली आहे.

शुबमन सर्वात युवा फलंदाज

शुबमन गिल टेस्ट आणि वनडेमध्ये द्विशतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. शुबमनने वयाच्या 25 व्या वर्षातच दोन्ही फॉर्मेटमध्ये द्विशतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. शुबमनआधी कोणत्याही फलंदाजाला इतक्या कमी वयात दोन्ही फॉर्मेटमध्ये द्विशतक करता आलं नव्हतं.

टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज

शुबमन गिल याने 2020 साली कसोटी पदार्पण केलं होतं. शुबमनने अवघ्या काही वर्षांत दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातील स्थान नक्की केलं. शुबमनने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 317 धावा केल्या आहेत. शुबमनने कसोटी कारकीर्दीत 7 शतकं आणि 7 अर्धशतकं ठोकली आहेत.

कॅप्टन शुबमनची चाबूक खेळी

टीम इंडियाकडून धावांचा डोंगर

शुबमनने या खेळीत 387 चेंडूत 269 धावा केल्या. शुबममने या द्विशतकी खेळीत 30 चौकार आणि 3 षटकार ठोकले. शुबमन व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. यशस्वी जैस्वाल याने 87 तर रवींद्र जडेजा याने 89 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने 42 धावा केल्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर उभारता आला.