AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Insta Story | विराटला नक्की झालंय काय? इंस्टा स्टोरीमुळे चाहत्यांना प्रश्न

Virat Kohli Instagram Story | विराट कोहली सातत्याने सोशल मीडियावर प्रामुख्याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करतोय. विराट स्टोरी शेअर करत असल्याने त्याला नक्की काय झालंय, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.

Virat Kohli Insta Story | विराटला नक्की झालंय काय? इंस्टा स्टोरीमुळे चाहत्यांना प्रश्न
| Updated on: Jun 21, 2023 | 9:25 PM
Share

मुंबई | क्रिकेट टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाचं सलग आणि एकूण दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. आता टीम इंडिया विश्रांतीवर आहे. टीम इंडिया काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या या टेस्ट सीरिजमधून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात करणार आहे. या दरम्यान टीम इंडियाचा विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून त्याच्या इंस्टा स्टोरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

विराटची अशीच एक आणखी इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. विराट सातत्याने अशा स्टोरी का शेअर करतोय, असा प्रश्न हा क्रिकेट चाहत्यांना पडलाय. विराटने आज 21 जून रोजी इंस्टा स्टोरी शेअर केलीय. विराटने मंगळवारी 20 जून रोजी एकूण 2 इंस्टा स्टोरी शेअर केल्या होत्या. या दोन्ही स्टोरी भिन्न होत्या. या दोन्ही स्टोरीजचा एकमेकांशी संबंध नव्हता. विराटची एक पोस्टही टेस्ट डेब्यूबाबत होती. तर दुसरी स्टोरी ही रहस्यमयी होती.

विराटची इंस्टा स्टोरी

विराटने आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी शानदार कामगिरी केली. विराटकडून त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनमध्ये जोरदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महाअंतिम सामन्यातील पहिल्या आण दुसऱ्या डावात अनुक्रमे 14 आणि 49 धावांची खेळी केली.

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 12 ते 16 जुलै

दुसरा सामना – 20-24 जुलै

वनडे सीरिज

पहिला सामना – 27 जुलै

दुसरा सामना 29 जुलै

तिसरा सामना 1 ऑगस्ट

टी 20 सीरिज

पहिला सामना – 4 ऑगस्ट

दुसरा सामना – 6 ऑगस्ट

तिसरा सामना – 8 ऑगस्ट

चौथ्या सामना – 12 ऑगस्ट

पाचवा सामना – 13 ऑगस्ट.

विंडिज दौऱ्याबाबत थोडक्यात

टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याची सुरुवात ही 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज पार पडेल. तर अखेरीस 5 मॅचची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या विंडिज दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.