IND vs ENG: विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुखापत, टीम इंडियाला टेन्शन, कमबॅक कधी?

Virat Kohli : टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा विराट कोहली दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. विराटच्या या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची टेन्शन वाढलं आहे.

IND vs ENG: विराटला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दुखापत, टीम इंडियाला टेन्शन, कमबॅक कधी?
virat kohli indian cricket team
| Updated on: Feb 06, 2025 | 2:11 PM

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हा नागपुरात खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फलंदाज यशस्वी जयस्वाल या दोघांचं एकदिवसीय पदार्पण झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. विराटला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टेन्शन वाढलं आहे.

विराटच्या गुडघ्याला दुखापत

विराटला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकावं लागलं आहे.विराटला गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे विराट पहिल्या सामन्यात खेळत नाहीय. विराट गुडघ्याच्या त्रासामुळे या सामन्यात खेळणार नसल्याचं कर्णधार रोहित शर्मा याने टॉस वेळेस सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर टीम इंडियासाठी ही चिंताजनक बाब आहे. आधीच जसप्रीत बुमराह हा या मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यात बुमराहवर चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. अशात विराटमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

हर्षित आणि यशस्वी जयस्वालंच पदार्पण

दरम्यान विराटची ही दुखापत यशस्वी जयस्वाल याच्या पथ्यावर पडली आहे. विराटला दुखापत झाल्याने यशस्वीला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळाली आहे. यशस्वीने यासह टी 20i, कसोटीनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं आहे. तसेच वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचाही वनडे डेब्यू झाला आहे.

विराट कोहली ‘आऊट’

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.