T20i World Cup 2026 : आयसीसी टीम इंडियाकडून टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी परत घेणार, कारण काय?

India vs New Zealand Icc T20i World Cup 2026 Final : भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडला पराभूत करुन जिंकलेली आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी परत करावी लागणार आहे. त्या एका नियमामुळे भारताला वर्ल्ड कप आयसीसीडे ट्रॉफी जमा करावी लागणार आहे.

T20i World Cup 2026 : आयसीसी टीम इंडियाकडून टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी परत घेणार, कारण काय?
Suryakumar Yadav T20i World Cup 2026 Winner Team India Captain
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 10, 2026 | 2:04 AM

टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत रविवारी 8 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. भारताने या विजयासह न्यूझीलंडने केलेल्या 3 पराभवांची परतफेड केली. टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील ही पहिलीच वेळ ठरली. तसेच टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तसेच सर्वाधिक 3 वेळा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला.

टीम इंडियाचा कारनामा

इंडिया सलग 2 आणि एकूण 3 टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारी पहिलीच टीम ठरली. तसेच इंडिया मायदेशात वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम ठरली. टीम इंडियाने अशाप्रकारे या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. भारताच्या या वर्ल्ड कप विजयाचा आनंद साऱ्या देशात साजरा केला जात आहे. मात्र या विजयाच्या 24 तासांनंतर आता ही आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी टीम इंडियाकडून परत घेतली जाणार आहे. आयसीसी टीम इंडियाकडून कोणत्या चुकीमुळे ही ट्रॉफी घेणार आहे का? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाकडून वर्ल्ड कप फायनलदरम्यान कोणतीही चूक झालेली नाही. तसेच भारताने कोणत्याही नियमाचं भंग केलेला नाही. मात्र त्यानंतरही ही ट्रॉफी भारताकडून घेतली जाणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार ही ट्रॉफी घेतली जाणार आहे.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमानुसार, विजयी संघाला खरी ट्रॉफी दिली जाते. खेळाडू या ट्रॉफीसोबत फोटो काढतात. त्यानंतर ती मुळ ट्रॉफी आयसीसीकडे सोपवण्यात येते. कोणत्याही विजयी संघाला खरीखुरी वर्ल्ड कप ट्रॉफी कायम स्वरुपी दिली जात नाही. विजयी संघाला आठवण म्हणून बनावट ट्रॉफी दिली जाते.

आयसीसीने 27 वर्षांआधी नियम केला होता. त्या नियमानुसार विजयानंतर विजेत्या संघाला मुळ ट्रॉफी दिली जाईल. टीमचे खेळाडू ट्रॉफीसोबत फोटो सेशन करतात. तसेच ट्रॉफीसोबत विजयी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर ती ट्रॉफी परत द्यावी लागते. त्यानंतर आयसीसी विजेता संघाला सेम टु सेम मात्र डुप्लीकेट ट्रॉफी देते. तर मुळ आयसीसी ट्रॉफी ही दुबईच्या मुख्यालयात ठेवण्यात येते. ट्रॉफी चोरी होऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून ट्रॉफी आयसीसी मुख्यालयात ठेवण्यात येते.

Follow Us