IND VS NZ: ‘या’ पाच कारणांमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये मिळवला पहिला धमाकेदार विजय

IND VS NZ: काय आहेत 'ती' पाच कारण?

IND VS NZ: 'या' पाच कारणांमुळे टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये मिळवला पहिला धमाकेदार विजय
Suryakumar-Yadav Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 5:30 PM

माऊंट माऊंगानुई: भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. पण दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादवने शतक ठोकलं. त्यानंतर दीपक हुड्डाने 10 धावा देऊन 4 विकेट काढल्या. न्यूझीलंडचा डाव 126 धावात आटोपला. भारताचने 65 रन्सनी विजय मिळवला. बे ओव्हलच्या पीचवर भारतीय फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागला. 7 फलंदाजांनी मिळून 67 धावा केल्या.

  • सूर्यकुमार यादवची शतकी इनिंग टीम इंडियाच्या विजयाच पहिलं कारण आहे. सूर्याने 51 चेंडूत 111 धावा ठोकल्या. त्याने 7 षटकार आणि 11 चौकार लगावले. सूर्याच्या इनिंगमुळे टीम इंडिया 191 धावसंख्येपर्यंत पोहोचली.
  • सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यामध्ये 82 धावांची भागीदारी झाली. ही पार्ट्नरशिप सुद्धा महत्त्वाची ठरली. या जोडीने 41 चेंडूत बाजी पलटवली. 82 पैकी 68 धावा सूर्याच्या बॅटमधून निघाल्या. पंड्याने 13 चेंडूत 13 धावा केल्या.
  • दीपक हुड्डाने आपल्या गोलंदाजीने टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या ऑफ स्पिनर गोलंदाजाने करीयरमधील सर्वोत्तम प्रदर्शन केलं. त्याने 10 रन्स देऊन 4 विकेट काढल्या. हुड्डाने मिचेल मिल्ने, ईश सोढी आणि टीम साऊदीची विकेट काढली.
  • युजवेंद्र चहलची मीडल ओव्हर्समधील कामगिरी सुद्धा टीम इंडियाच्या विजयाच कारण ठरली. या लेग स्पिनरला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही. पण न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये मैदानात उतरला. 4ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 2 विकेट काढल्या. चहलने फिलिप्स आणि नीशॅमच्या विकेट काढल्या.
  • केन विलयम्सनची धीमी फलंदाजी सुद्धा टीम इंडियाच्या विजयाच कारण ठरली. विलयम्सन मोठा खेळाडू आहे. पण टी 20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट एक मोठा मुद्दा आहे. विलयम्सन पहिल्या ओव्हरपासून 18 व्या ओव्हरपर्यंत क्रीजवर होता. त्याने 48 चेंडूत अर्धशतक फटकावलं. त्याने 117.30 च्या स्ट्राइक रेटने 61 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.