IND vs SA 2nd Test | दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडिया आफ्रिकेला चारणार धूळ, जाणून घ्या कारण
IND vs SA 2nd Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा विजयय जवळपास निश्चित मानला जात आहे.

मुंबई : टीम इंडियाला आतापर्यंत साऊथ आफ्रिकेमध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित अँड कंपनी हा महारेकॉर्ड आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने आली होती. मात्र पहिल्याच सामन्यात टांगा पलटी झाला, टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी आफ्रिका संघाने पराभव केला. टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न परत एकदा भंगलं आहे. आता ३ जानेवारील दुसरा कसोटी सामना होणार आहे. केप टाऊन या मैदानावर सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
केपटाऊनच्य मैदानावर टीम इंडियाने अजुन एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. पण या मैदानावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे रेकॉर्ड कडक आहेत. जसप्रीत बुमराहने कसोटी करियरची सुरुवात याच मैदानावर केली होती. पहिल्या सामन्यात बुमराहने आपली छाप पाडत सर्वांचं लक्ष वेधलं होतं.
जसप्रीत बुमराहने या मैदानावर आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर एकूण 10 विकेट्स आहेत. 2018 मध्ये कसोटी पदार्पण करताना त्याने या मैदानावर एकूण 4 विकेट घेतल्या. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने न्यूलँड्स स्टेडियमवर एकदा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह मॅचविनरची भूमिका पार पाडू शकतो.
दरम्यान, रोहित शर्मा अँड कंपनीला मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. केप टाऊनमध्ये याआधी 6 कसोटी सामने झाले आहेत. त्यामधील 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर जर टीम इंडियाने विजय मिळवला तर पहिला विजय ठरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान
