AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडला क्लिन स्वीप, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारताने इंग्लंडचा 3-0 ने धुव्वा उडवला. खरं तर ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची होती. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाची ताकद कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना पाहता आली.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडला क्लिन स्वीप, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज
Image Credit source: BCCI
| Updated on: Feb 12, 2025 | 8:23 PM
Share

भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 3-0 ने पराभव केला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात भारताची सुरुवात अडखळत झाली. अवघी एक धाव करून रोहित शर्मा बाद झाला. पण त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. शुबमन गिलने वनडे क्रिकेटमधील सातवं शतक ठोकलं. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चांगल्या फॉर्मात असल्याचं दाखूवन दिलं. विराट कोहलीला शेवटच्या सामन्यात सूर गवसला. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. श्रेयस अय्यरनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. भारताने 50 षटकात सर्व गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही इंग्लंडला गाठता आलं नाही. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभव सहन करावा. इंग्लंडने षटकात सर्व गडी गमवून 214 धावा केल्या. भारताने तिसरा सामना 142 धावांनी जिंकला.

भारताने विजयासाठी दिलेल्या 357 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. फिलीप सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. तर टॉम ब्रॅडनने सॉल्टसह ही भाीदारी वाढवली. पण त्यानंतर घसरगुंडी सुरु झाली. मधल्या फळीतील फलंदाज सपशेल फेल ठरले. जो रूट, जोस बटलर स्वस्तात बाद झाले. इंग्लंडच्या अशा खेळीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी चांगल्या खेळीच्या अपेक्षा आता मावळल्या आहेत. इंग्लंडचा संघ भारताच्या गटात नाही. पण इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली तर भारताशी सामना होऊ शकतो.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.

इंग्लंड (खेळणारा इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, टॉम बँटन, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, गस अ‍ॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!