IND vs ENG : दुसर्या सामन्यातून या खेळाडूचा पत्ता कट! कॅप्टन रोहित प्लेइंग ईलेव्हनमधून काढणार?
India vs England 2nd Odi : विराट कोहली याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागलं. मात्र आता विराट दुखापतीनंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातून युवा खेळाडूला बाहेर व्हावं लागू शकतं.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर टीम इंडियाने त्याच अंदाजात एकदिवसीय मालिकेची सुरुवात केली. टीम इंडियाने गुरुवारी 6 फेब्रुवारीला इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा रविवारी 9 फेब्रुवारीला खेळवणयात येणार आहे. कॅप्टन रोहित दुसऱ्या सामन्यासाठी युवा खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देऊ शकतो.
विराट कोहली याला पहिल्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळता आलं नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा या दोघांना पदार्पणाची संधी मिळाली. हर्षितने या संधीचं सोनं करत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र यशस्वीला छाप सोडता आली नाही. यशस्वीला पदार्पणातील सामन्यात काही खास करता आलं नाही.
यशस्वीने नागपुरात झालेल्या सलामीच्या सामन्यात यशस्वीसह ओपनिंग केली. मात्र यशस्वी 15 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे यशस्वीला दुसऱ्या सामन्यातून डच्चू दिला जाऊ शकतो.
विराट कमबॅक करणार!
विराट दुसऱ्या सामन्यातून कमबॅक करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे यशस्वीला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागू शकतं. त्यामुळे पुन्हा दुसर्या सामन्यात ओपनिंग जोडी बदलू शकते. यशस्वी बाहेर झाल्यास रोहितसोबत उपकर्णधार शुबमन गिल ओपनिंगला येऊ शकतो. तर विराट नेहमीच्याच तिसऱ्या स्थानी खेळू शकतो.
वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.
