‘CSK शिवाय धोनी नाही, धोनीशिवाय CSK नाही’, एमएस धोनीला रिटेन करण्याबाबत संघाच्या माजी मालकांची भूमिका स्पष्ट

| Updated on: Oct 19, 2021 | 1:00 PM

चेन्नईने आयपीएल 2021 चं जेतेपद पटकावून चौथ्यांदा करंडक उंचावण्याचा मान मिळवला. जेवढी चर्चा चेन्नईने फायनल मारल्याची झाली तेवढीच चर्चा किंबहुना त्यापेक्षा अधिक चर्चा धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याची झाली.

‘CSK शिवाय धोनी नाही, धोनीशिवाय CSK नाही’, एमएस धोनीला रिटेन करण्याबाबत संघाच्या माजी मालकांची भूमिका स्पष्ट
MS Dhoni
Follow us on

मुंबई : चेन्नईने आयपीएल 2021 चं जेतेपद पटकावून चौथ्यांदा करंडक उंचावण्याचा मान मिळवला. जेवढी चर्चा चेन्नईने फायनल मारल्याची झाली तेवढीच चर्चा किंबहुना त्यापेक्षा अधिक चर्चा धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याची झाली. पण आता चेन्नई आणि माही फॅन्सना मोठा दिलासा मिळालेला आहे. चेन्नई सुपर किंग्ज एम एस धोनीला रिटेन करणार असल्याचे बोलले जात आहे. या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची पूर्वी मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी सोमवारी सांगितले की, “महेंद्रसिंग धोनीशिवाय CSK ​​ची कल्पना केली जाऊ शकत नाही.” (There is no CSK without MS Dhoni,’ says N. Srinivasan)

बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन म्हणाले की, “चेन्नई सुपर किंग्जशिवाय धोनीची कल्पना केली जाऊ शकत नाही, ज्यावरुन हा दिग्गज क्रिकेटपटू आणि या फ्रँचायझी संघामधील सखोल संबंध स्पष्ट होतो. धोनी CSK, चेन्नई आणि तामिळनाडूचा अविभाज्य भाग आहे,” श्रीनिवासन यांनी आयपीएल ट्रॉफीसह भगवान वेंकटचलापतीच्या मंदिराला भेट दिली, त्यावेळी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले की, “धोनीशिवाय CSK ​​नाही आणि CSK शिवाय धोनी नाही.” सीएसके 2014 पर्यंत इंडिया सिमेंटच्या मालकीची फँचायझी होती. यानंतर चेन्नई सुपर किंग्जची मालकी क्रिकेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली.

धोनीला रिटेन करणार!

आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज आपले पहिले रिटेन्शन कार्ड फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी वापरणार आहेत, अशी माहिती सीएसकेच्या मॅनेजमेंटने दिली आहे. याआधी धोनीने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावल्यानंतर हर्षा भोगलेशी केलेल्या संभाषणात आयपीएल 2022 मध्ये खेळण्याबाबत संकेत दिले होते. हर्षाने वारसा हा शब्द मुद्दाम वापरुन धोनीच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला. मात्र सध्या असं काही करणार नाही, असं म्हणत त्याने 2022 मध्ये खेळण्याबाबत संकेत दिले.

आयपीएलचा पुढचा हंगाम धोनी खेळणार!

बरं, आता CSK संघ व्यवस्थापनानेही धोनीने हर्षाला दिलेल्या प्रतिक्रियेवर शिक्कामोर्तब केले आहे. एएनआयला दिलेल्या संभाषणात सीएसकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “हे खरं आहे की त्याला कायम ठेवण्यात येणार आहे. पण किती रिटेंशन करणार, हे अद्याप ठरलेलं नाही, किंवा तशी बोलणी झालेली नाहीय. पण खरं सांगायचं तर, रिटेंशन करण्याच्या प्रक्रियेने महेंद्रसिंग धोनीला काही फरक पडत नाही. त्याच्या बाबतीत, ही दुय्यम गोष्ट असेल. आम्ही त्याच्यासाठी आमचं पहिलं रिटेंशन कार्ड वापरु. CSK ला त्याच्या अनुभवाची गरज आहे. म्हणजेच धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम धोनी खेळणार, हे निश्चित!

इतर बातम्या

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

(There is no CSK without MS Dhoni,’ says N. Srinivasan)