मोठी बातमी : चेन्नई सुपर किंग्ज MS धोनीला रिटेन करणार, पुढचा IPL हंगाम खेळण्यावरही शिक्कामोर्तब

चेन्नईने आयपीएल 2021 चं जेतेपद पटकावून चौथ्यांदा करंडक उंचावण्याचा मान मिळवला. जेवढी चर्चा चेन्नईने फायनल मारल्याची झाली तेवढीच चर्चा किंबहुना त्यापेक्षा अधिक चर्चा धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याची झाली. पण आता चेन्नई आणि माही फॅन्सना मोठा दिलासा मिळालेला आहे.

मोठी बातमी : चेन्नई सुपर किंग्ज MS धोनीला रिटेन करणार, पुढचा IPL हंगाम खेळण्यावरही शिक्कामोर्तब
एम एस धोनी

मुंबई : चेन्नईने आयपीएल 2021 चं जेतेपद पटकावून चौथ्यांदा करंडक उंचावण्याचा मान मिळवला. जेवढी चर्चा चेन्नईने फायनल मारल्याची झाली तेवढीच चर्चा किंबहुना त्यापेक्षा अधिक चर्चा धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याची झाली. पण आता चेन्नई आणि माही फॅन्सना मोठा दिलासा मिळालेला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज एम एस धोनीला रिटेन करणार आहे.

धोनीला रिटेन करणार!

आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज आपले पहिले रिटेन्शन कार्ड फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी वापरणार आहेत, अशी माहिती सीएसकेच्या मॅनेजमेंटने दिली आहे. याआधी धोनीने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावल्यानंतर हर्षा भोगलेशी केलेल्या संभाषणात आयपीएल 2022 मध्ये खेळण्याबाबत संकेत दिले होते. हर्षाने वारसा हा शब्द मुद्दाम वापरुन धोनीच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला. मात्र सध्या असं काही करणार नाही, असं म्हणत त्याने 2022 मध्ये खेळण्याबाबत संकेत दिले.

आयपीएलचा पुढचा हंगाम धोनी खेळणार!

बरं, आता CSK संघ व्यवस्थापनानेही धोनीने हर्षाला दिलेल्या प्रतिक्रियेवर शिक्कामोर्तब केले आहे. एएनआयला दिलेल्या संभाषणात सीएसकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “हे खरं आहे की त्याला कायम ठेवण्यात येणार आहे. पण किती रिटेंशन करणार, हे अद्याप ठरलेलं नाही, किंवा तशी बोलणी झालेली नाहीय. पण खरं सांगायचं तर, रिटेंशन करण्याच्या प्रक्रियेने महेंद्रसिंग धोनीला काही फरक पडत नाही. त्याच्या बाबतीत, ही दुय्यम गोष्ट असेल. आम्ही त्याच्यासाठी आमचं पहिलं रिटेंशन कार्ड वापरु. CSK ला त्याच्या अनुभवाची गरज आहे. म्हणजेच धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम धोनी खेळणार, हे निश्चित!

चेन्नईचा डंका, जेतेपदावर चौथ्यांदा नाव

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 4 आयपीएलचे हंगाम आपल्या नावे केले आहेत. कोलकात्याला हरवून चेन्नईने आयपीएल 2021 चं जेतेरद आपल्या नावे केलं. सीएसकेचा फलंदाज फाफ डु प्लेसिस आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. त्याच वेळी, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ज्याने 635 फटकावत ऑरेंज कप मिळविली.

MS Dhoni retain by CSK ipl 2022 Auction first retension Card will be used

हे ही वाचा :

IPL 2021 मधून भारतीय क्रिकेटला मिळाले 5 मौल्यवान हिरे, फलंदाज, गोलंदाजासह अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश

IPL 2021 : ऋतुराज-फाफची धमाल, सीएसकेची कमाल, रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड, दिग्गजांच्या पंक्तीत स्थान!

IPL चा 14 वा इमर्जिंग प्लेयर ऋतुराज गायकवाड, नेमका कसा मिळतो हा मान? कोण आहेत याआधीचे इमर्जिंग प्लेयर?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI