AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs PAK : शाहिद आफ्रिदीच्या जावयाची धुलाई, न्यूझीलंडच्या फलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये चोपल्या इतक्या धावा

Shaheen Afridi NZ vs PAK 2nd T20i : दुसर्‍या टी 20i सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सायफर्ट याने शाहीन शाह आफ्रिदी याची जोरदार धुलाई केली. सायफर्टने एका ओव्हरमध्ये 4 सिक्ससह एकूण 26 धावा केल्या.

NZ vs PAK : शाहिद आफ्रिदीच्या जावयाची धुलाई, न्यूझीलंडच्या फलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये चोपल्या इतक्या धावा
Pakistan Bowler Shaheen AfridiImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 4:46 PM

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेतील दुसरा सामना हा पावसामुळे 15 ओव्हरचा करण्यात आला. उभयसंघातील सामना हा युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन येथे खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याचा जावई आणि वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याची जोरदार धुलाई करण्यात आली. न्यूझीलंडचा सलामीवीर टीम सायफर्ट याने शाहिनच्या बॉलिंगवर स्फोटक फलंदाजी करत सिक्सची रांग लावली. सायफर्टने सामन्यातील दुसर्‍या डावात ही फटकेबाजी केली. शाहिनची पावर प्लेमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक अशी गणना केली जाते. मात्र न्यूझीलंडविरुद्ध उलट चित्र पाहायला मिळालं.

6,6,0,2,6,6, शाहिनची धुलाई

शाहिनने या सामन्यात चागंली सुरुवात केली. शाहिनने न्यूझीलंडच्या इनिंगमधील पहिलीच ओव्हर मेडन टाकली. मात्र त्यानंतर शाहीन त्याच्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला. शाहीनची या ओव्हरमध्ये टीम सायफर्टने धुलाई केली. सायफर्टने शाहिदची सिक्सने स्वागत केलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर पुन्हा सिक्स लगावला. शाहिनने तिसऱ्या बॉलवर कमबॅक केलं. शाहिनने तिसऱ्या बॉलवर एकही धाव दिली नाही. त्यानंतर टीम सायफर्टने चौथ्या बॉलवर 2 धावा केल्या आणि पुन्हा स्ट्राईकवर आला. सायफर्टने शाहीनला शेवटच्या 2 बॉलवर 2 खणखणीत षटकार लगावले. सायफर्टने अशाप्रकारे शाहीनच्या एका ओव्हरमध्ये 26 धावा कुटल्या.

न्यूझीलंडच्या ओपनरची स्फोटक खेळी

सायफर्टने या स्फोटक खेळीसह न्यूझीलंडला 136 धावांचा पाठलाग अप्रतिम सुरुवात करुन दिली. सायफर्टने 22 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 45 रन्स केल्या. त्यानंतर इतर फलंदाजानी आपली भूमिका चोखपणे पार पाडत न्यूझीलंडला विजयी केलं. सायफर्ट व्यतिरिक्त न्यूझीलंडसाठी फिन एलन याने 38, मिचेल हे 21 आणि डॅरेल मिचेल याने 14 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडने 13.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 137 धावा केल्या आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडी घेतली.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टिम सेफर्ट, फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल हे (विकेटकीपर), झकरी फॉल्क्स, जेकब डफी, ईश सोधी आणि बेन सीयर्स.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : सलमान आघा (कर्णधार), मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, अब्दुल समद, खुशदिल शाह, जहांदाद खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अली.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.