Cricket : जगातील सर्वात श्रीमंत पाच क्रिकेटपटू, टॉप तीनमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश, पाहा कोण?
भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी क्रिकेटचे जास्त चाहते आपल्या देशात पाहायला मिळतील. गेल्या चार पिढ्या पाहिल्या तर प्रत्येक पिढीतील क्रिकेटचे हिरो वेगळे होते. कपिल देव, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, धोनी आता रोहित शर्मा आणि विराट कोहली अशी मोठी नावे राहिली आहेत. बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखल जातं. पण तुम्हाला माहिती का जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू कोण आहे? जाणून घ्या.

जगातील सर्वत श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. दोन दशकांपेक्षा जास्त क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या सचिने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. बिझनेस इनसाइडने दिलेल्या अहवालानुसार सचिन तेंडुलकर याची एकूण संपत्ती 170 दशलक्ष डॉलर्स (म्हणजेच 1500 कोटी) इतकी आहे.
भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणाऱ्या कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंह धोनी. T-20 वर्ल्ड कप 2007, ODI वर्ल्ड कप 2011 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2013 धोनीने त्याच्या नेतृत्त्वामध्ये जिंकली होती. धोनी अजुनही आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळत असून त्याची एकूण संपत्ती 111 दशलक्ष डॉलर (म्हणजेच 1000 कोटी) इतकी आहे
भारताचा माजी कर्णधार जो जगभर किंग कोहली म्हणून ओळखला जातो. विराट कोहली याने सचिनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके ठोकली आहेत. जगभरात आपल्या आक्रमक खेळासह नेतृत्त्वाने छाप पाडली. या यादीमध्ये कोहली तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची संपत्ती ९३ दशलक्ष (म्हणजेच ८०० कोटी) इतकी आहे. कोहली अजुनही भारताकडून क्रिकेट खेळत आहे. आता झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये अजुनही तो खेळत आहे.
या यादीमध्ये सर्वाधिक वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा समावेश आहे. रिकी पाँटिंग हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा क्रिकेटपटू आहे. पाँटिंगची एकूण संपत्ती 70 दशलक्ष डॉलर (अंदाजे 600 कोटी रुपये) आहे. वेस्ट इंडिज संघाचा माजी खेळाडू ब्रायन लारा याचा यादीमध्ये पाचवा क्रमांक आहे. ब्रायन लाराचा कसोटीमधील वैयक्तिक सर्वोच्च 400 धावा केल्या होत्या. ब्रायन लारा यांची संपत्ती 70 दशलक्ष डॉलर (अंदाजे 500 कोटी रुपये) आहे.
