AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trent Boult IPL 2022 Auction: ट्रेंट बोल्टसाठी तीन संघांची टक्कर, मुंबईनं गमावलं, बोल्ट कुणासाठी विकेट घेणार?

Trent Boult IPL 2022 Auction : ट्रेंट बोल्ट याला (Trent Boult) आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL 2022 Auction) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या टीमचा भाग बनला आहे.

Trent Boult IPL 2022 Auction: ट्रेंट बोल्टसाठी तीन संघांची टक्कर, मुंबईनं गमावलं, बोल्ट कुणासाठी विकेट घेणार?
ट्रेंट बोल्ट
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 1:19 PM
Share

नवी दिल्ली : ट्रेंट बोल्ट याला (Trent Boult) आयपीएल 2022 च्या लिलावात (IPL 2022 Auction) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या टीमचा भाग बनला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 8 कोटी रुपये देऊन आपल्या टीममध्ये घेतला आहे. ट्रेंट बोल्ट हा मूळचा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. बोल्टची आयपीएल कारकीर्द यशस्वी राहिलेली आहे. मागच्या सीझनमध्ये तो मुंबई इंडियन्स या टीमकडून खेळत होता. त्यामुळे यावेळी त्यावर पहिल्यांदा आरसीबीने बोली लावली, त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं बोली लावली. दोन्ही टीम्सनं बोली 5 कोटींच्या वर पोहोचवली. यानंतर मुंबई इंडियन्स ची टीम देखील यामध्ये सहभागी झाली. मात्र, त्यानंतर मुंबईच्या टीमनं माघार घेतली. यामुळं राजस्थानच्या टीमनं ने बोल्टला आपल्या टीममध्ये घेतलं. गेल्या सीझनच्या तुलनेत बोल्टची या सीझनची प्राईस वाढली आहे. गेल्या सीझनमध्ये बोल्टला मुंबईनं 3.20 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.

पॉवरप्लेमध्ये जोरदार गोलंदाजी

ट्रेंट बोल्ट हा नामाकिंत वेगवान गोलदांजांपैकी महत्त्वाचा खेळाडू आहे. टॉप बोलर्समध्ये त्याचा समावेश आहे. बोल्ट पॉवर प्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो. यासह स्लॉग ओवर्स मध्येही त्याचा जलवा पाहायला मिळतो. ट्रेंट बोल्टकडे आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मॅचचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. बोल्टची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं असताना आयपीएलमध्ये त्याला टीममध्ये घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. बोल्ट हा 2020 मध्ये मुंबईकडून खेळत होता, त्याला मुंबईनं 3.20 कोटी रुपयांना टीममध्ये घेतलं होतं. त्यापूर्वी तो दिल्लीच्या टीमकडून खेळत होता.

ट्रेंट बोल्ट आयपीएलमध्ये 2015 पहिल्यांदा खेळ्यासाठी आला त्यावेळी त्याला 3.80 कोटी रुपये मिळाले होते. त्यानंतर 2017 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सनं खेळत होता. त्यावेळी त्याला 5 कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी त्याला मिळालेली रक्कम ही सर्वाधिक आहे. आयपीएल मध्ये बोल्टनं 62 मॅच खेळल्या असून 76 विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी 8.4 राहिली आहे. विकेट घेण्याची सरासरी 26.09 इतकी राहिली आहे. 18 रन्सवर चार विकेट हे त्यांचं चांगलं प्रदर्शन राहिलं आहे.

आयपीएलचं ट्विट

ट्रेंट बोल्टनं आतापर्यंत 44 टी-20 मॅच खेळल्या आहेत. आतापर्यंत 62 विकेट त्यानं घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यानं 301 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 मॅचेसमध्ये 169 विकेट घेतल्या आहेत.

इतर बातम्या:

IPL Auction 2022 | श्रेयससाठी कोलकाताने मोजले तब्बल 12.25 कोटी! पाहा कुणाची किती कोटींची बोली?

IPL 2022 Auction: पहिल्या पाच खेळाडूंची इतक्या कोटींना विक्री? कुठल्या संघाकडून खेळणार? समजून घ्या

Trent boult ipl 2022 auction Rajasthan Royals buys for the auction price of 8 crore rupees

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.