AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि…

भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ संघात ट्राय नेशन ए सिरीज सुरू आहे. या मालिकेतील सात सामन्यांचा खेळ संपला. सातव्या सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केलं. त्यामुळे अंतिम फेरीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि...
Tri Nation A Series: श्रीलंकेने भारताला पराभूत केल्याने अंतिम फेरीचा मार्ग किचकट, आता जर तर आणि...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 15, 2026 | 7:22 PM
Share

ट्राय नेशन ए सिरीज 2026 स्पर्धेत तीन संघात अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी लढत सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात या स्पर्धेतील सातवा आणि संघांचा तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गडी गमवून 265 धावा केल्या आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. पण या सामन्यात विपरज निगमने केलेल्या चुकीमुळे 10 धावांचं नुकसान झालं आणि फुकटच्या 10 धावा श्रीलंकेला मिळाल्या. खेळपट्टीच्या मधून धावल्याने पंचांनी 10 धावांची पेनल्टी दिली. त्यामुळे श्रीलंकेची सुरूवात विना बाद 10 धावांनी झाली. त्यात हा सामना शेवटच्या षटकात बॉल टू बॉल आला होता. त्यामुळे धाव किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येत होता. अखेर हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि भारताने हा सामना गमावला. भारताला सुपर ओव्हरमध्ये 17 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 9 धावा करू शकला आणि 7 धावांनी सामना गमावला.

भारतासाठी करो या मरोची लढाई

भारताचा चौथा आणि शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. हा सामना करो या मरोची लढाई ठरणार आहे. श्रीलंकेने शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत केलं तर भारताला अंतिम फेरीची सहज संधी मिळेल. म्हणजेच भारताला अफगाणिस्तानला काहीही करून पराभूत करावं लागेल. त्यानंतर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत केलं तर मात्र जर तर वर येईल. भारताला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकवा तर लागेलच. वरून नेट रनरेटचं गणित सोडवावं लागेल. कारण या स्थितीत तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होतील. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट नेट रनरेटच्या आधारावर ठरेल.श्रीलंकेचे 4 गुण आणि नेट रनरेट हा +0.494 आहे. तर भारताचे 2 गुण असून नेट रनरेट +0.032, तर अफगाणिस्ताने 2 गुण आणि नेट रनरेट हा -1.392 आहे.

भारताचा चौथा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 17 जून रोजी होणार आहे. हा सामना भारताला काहीही करून जिंकवाच लागणार आहे. अन्यथा या स्पर्धेतून आऊट होईल. भारताने हा सामना जिंकल्यानंतर श्रीलंका अफगाणिस्तान सामन्यावर लक्ष ठेवावं लागेल. हा सामना 19 जूनला होणार आहे. हा सामना श्रीलंकेने जिंकला तर भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. पण अफगाणिस्तानने जिंकला तर मात्र सर्व गणित नेट रनरेटवर येईल. त्यामुळे या दोन्ही सामन्यांचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीचा सामना 21 जून रोजी होणार आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले