SL vs IND : टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs Sri Lanka Tri Series Live Streaming : एका बाजूला आयपीएलच्या 18 व्या मोसमाकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असताना रविवारपासून ट्राय सीरिजला सुरुवात होत आहे. रविवारी मालिकेतील पहिला सामना हा भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे.

SL vs IND : टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
India vs Sri Lanka Tri Series Live Streaming
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 26, 2025 | 9:37 PM

भारतात आयपीएल 2025 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत सध्या प्लेऑफच्या हिशोबाने चढाओढ सुरु आहे. काही संघांचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला टॉप 6 मधील संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशात आता रविवार 27 एप्रिलपासून क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी असणार आहे. रविवारपासून वूमन्स ट्राय सीरिजला सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोघांपैकी कोण यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

तिरंगी मालिकेत यजमान श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने असणार आहेत. या मालिकेत एकूण 7 सामने होणार आहेत. तसेच प्रत्येक संघ 4 सामने खेळणार आहे. या मालिकेचा थरार हा 27 एप्रिल ते 11 मे दरम्यान रंगणार आहे. मालिकेतील सर्व सामने हे आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. या मालिकेची सुरुवात भारत-श्रीलंका सामन्याने होणार आहे. या सामन्यानिमित्ताने सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृ्त्व करणार आहे. तर चमारी अथापथु हीच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. हा सामना किती वाजता सुरु होईल? टीव्हीवर-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? ही माहिती जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना रविवारी 27 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे लाईव्ह पाहता येईल.

वनडे ट्राय सीरिजसाठी वूमन्स श्रीलंका टीम : चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी सिल्वा, कविशा दिलहरी, अनुष्का संजीवनी, हसिनी परेरा, पियुमी वाथ्सला, मनुडी नानायककारा, देउमी विहंगा, इनोका रणवीरा, इनोशी फर्नांडो, हंसिमा करुणारत्ने, रश्मिका शिववंडी, मलकी मदारा, सुगंधिका कुमारी आणि अचीनी कुलसूरिया.

तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरविंद, अरविंद, अरविंद, शुक्ल राऊत. उपाध्याय.