AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : फक्त एकटी ‘अनुपमा’ आयपीएलला नडली, बाकी सगळ्यांनी टेकले गुडघे

IPL 2023 : फक्त एकटी अनुपमा आयपीएलसमोर टिकली. सध्या सुरु असलेली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जोरात सुरु आहे. आयपीएल आता निर्णायक आणि रंगतदार वळणावर आहे. आयपीएल स्पर्धेत प्लेऑफमध्ये कुठले चार संघ पोहोचणार? याची उत्सुक्ता आहे.

IPL 2023 : फक्त एकटी 'अनुपमा' आयपीएलला नडली, बाकी सगळ्यांनी टेकले गुडघे
IPL 2023 AnupamaImage Credit source: PTI
| Updated on: May 19, 2023 | 10:09 AM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रेक्षक दर आठवड्याला येणाऱ्या TRP रिपोर्टची आतुरतेने वाट पाहतात. टीआरपी लिस्टमध्ये फॅन्स आपल्या आवडत्या सीरियलचा शोध घेतात. BARC ने या आठवड्यात 19 वी TRP लिस्ट जारी केली आहे. या लिस्टवर नजर टाकल्यास लक्षात येईल की, IPL समोर ‘अनुपमा’ सोडून बाकी सीरियल्सच्या TRP रेटिंगची नौका बुडाली आहे. मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही स्टार प्लस वाहिनीवरील फेमस शो ‘अनुपमा’ BARC च्या टीआरपी लिस्टमध्ये टॉपवर आहे.

या शो ची रेटिंग 2.8 आहे. आयपीएल नंतर अनुपमाच्या टीआरपी रेटिंगमध्ये फक्त 0.2 ते 0.3 इतकाच बदल झालाय. अन्य सीरियल्सची मात्र खूप वाईट अवस्था आहे.

दुसऱ्या नंबरवर कोण ?

अनुपमाशिवाय आयशा सिंह आणि नील भट्ट यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुम हैं किसी के प्यार में’ आणि प्रणाली राठोड-हर्षद चोपड़ा यांचा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे शो टीआरपी रेटिंगमध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत. या दोन्ही शो च रेटिंग 2.2 आहे. क्रिकेटमुळे टीव्ही मालिकांच्या टीआरपीमध्ये 0.7 ते 0.8 पर्यंत घसरण झालीय.

टॉप 10 मध्ये ‘या’ दहा मालिका

BARC च्या टीआरपी रिपोर्टमध्ये छोट्या पडद्यावरील टॉप 10 शो मध्ये इमली, पंड्या स्टोर, ये हैं चाहतें, फालतू, तारक मेहता का उलटा चश्मा, भाग्यलक्ष्मी आणि तेरी मेरी दूरियां हे शो ज आहेत.

ट्रोलिंग होऊनही ‘अनुपमा’ हिट

BARC ने जारी केलेल्या टीआरपी लिस्टमध्ये स्टार प्लस वाहिनीचे अनेक कार्यक्रम टॉप 10 मध्ये आहेत. रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘अनुपमा’ मालिकेला करंट ट्रॅकमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ट्रोलिंग होऊनही शो च्या टीआरपी रेटिंगवर फार परिणाम झाला नाही. त्यामुळे 19 व्या आठवड्यातही ‘अनुपमा’ पहिल्या स्थानावर कायम आहे. कपिल शर्माच्या शो च काय?

कपिल शर्माचा शो सुद्धा या आठवड्यात विशेष कमाल दाखवू शकला नाही. द कपिल शर्मा शो आणि इंडियाज बेस्ट डान्स सीजन 3 या दोन्ही कार्यक्रमांची टीआरपी या आठवड्यात 1.1 आहे.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.