IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये, सामना केव्हा?

U19 Asia Cup 2023 | क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये असणार आहेत. जाणून घ्या सेमी फायनलचे सामने केव्हा आणि कुठे होणार?

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये, सामना केव्हा?
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 7:26 PM

दुबई | दुबईत 8 डिसेंबरपासून 8 संघांमध्ये क्रिकेट अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धा खेळवण्यात येत आहे. 5 दिवसानंतर अखेर 8 संघांमधून सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. सेमी फायनलमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूएई या 4 संघांनी एन्ट्री केली आहे. तर तितक्याच अर्थात 4 संघाचा पत्ता कट झाला आहे. आता या 4 संघात शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी दोन्ही सेमी फायनल आणि 15 डिसेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. बुधवारी 13 डिसेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि यूएई विरुद्ध जपान यांच्यात सामने खेळवण्यात आले. या सामन्यांच्या निकालानंतर सेमी फायनलचं गणित स्पष्ट झालं.

बांगलादेशने आधीच 2 सामने जिंकून सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलं होतं. त्यामुळे बी ग्रुपमधून श्रीलंकेसाठी करो या मरो असा सामना होता. बांगलादेशने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकेचा या पराभवासह आशिया कपमधून बाजार उठला. तर दुसऱ्या सामन्यात यूएईने जपानवर 107 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बी ग्रुपमधून बांगलादेश आणि यूएई या 2 संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं. तर ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि पाकिस्तानने आधीच क्वालिफाय केलं होतं. त्यामुळे ए ग्रुपमधून अफगाणिस्तान, नेपाळ तर बी ग्रुपमधून श्रीलंका आणि जपानचा बाजार उठला आहे.

उपांत्य फेरीतील दोन्ही सामने एकाच दिवशी

दरम्यान सेमी फायनलमधील पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध यूएई असा सामना हा 15 डिसेंबरला होणार आहे. या सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. या सामन्याचं आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलंय. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बांगलादेश विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. या सामन्यालाही सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. हा सामना आयसीसी अकादमी ग्राउंड, दुबई येथे आयोजित करण्यात आला आहे. अर्थात टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळतील.

टीम इंडिया | उदय सहारन (कॅप्टन), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंग, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, रुद्र पटेल, नमन तिवारी, इनेश महाजन आणि धनुष गौडा.

बांगलादेश टीम | महफुजुर रहमान रब्बी (कॅप्टन), आशिकुर रहमान शिबली (विकेटकीपर), जिशान आलम, चौधरी मो. रिझवान, अरिफुल इस्लाम, अहरार अमीन, मोहम्मद शिहाब जेम्स, , परवेझ रहमान जिबोन, रोहनत दौल्ला बोरसन, मो. इक्बाल हुसेन इमॉन, मारुफ मृधा, मो. रफी उज्जमान रफी, वासी सिद्दीकी, आदिल बिन सिद्दिक, मोहम्मद रोहनत, मोहम्मद असरफुझमान आणि बोरान्नो मोहम्मद इक्बाल.

पाकिस्तान टीम | साद बेग (कॅप्टन आणि विकेटकीपर), शाहजैब खान, अझान अवेस, मोहम्मद झीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफात मिन्हास, शमील हुसेन, अमीर हसन, उबेद शाह, खुबैब खलील, अली असफंद, अहमद हुसैन, नावेद अहमद खान आणि नजाब खान.

यूएई टीम | अयान अफझल खान (कर्णधार), अक्षत राय, ध्रुव पराशर, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), तनिश सुरी, एथन डीसूझा, मारूफ मर्चंट, अम्मर बदामी, हार्दिक पै, अयमन अहमद, ओमिद रहमान, हरित शेट्टी, श्रेय सेठी, यिन राय आणि हर्षित सेठ.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.