
अंडर 19 टीम इंडियाचा 14 वर्षीय कर्णधार वैभव सूर्यवंशी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या यूथ वनडे सीरिजमध्ये धमाका कायम ठेवला आहे. वैभवने दुसऱ्या वनडेत 19 चेंडूत अर्धशतक लगावलं होतं. मात्र वैभव 68 धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. मात्र वैभवने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात (U19 SA vs IND 3rd One Day) ती उणीव भरुन काढली आहे. वैभवने अंतिम सामन्यात चाबूक शतक (Vaibhav Suryavanshi Century) ठोकलं आहे. वैभवने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात धमाकेदार शतक झळकावलं आहे. वैभवचं हे 2026 वर्षातील आणि कर्णधार म्हणून पहिलं शतक ठरलं आहे. वैभवच्या या खेळीनंतर सोशल मीडियावर त्याचं अभिनंदन केलं जात आहे.
वैभवने 23 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत हे शतक पूर्ण केलं. वैभवने शतकापर्यंत पोहचण्यासाठी फक्त 68 चेंडूंचा सामना केला. वैभवने या शतकी खेळीत षटकार आणि चौकारांच्या मदतीने एकूण 72 धावा जोडल्या. वैभवने 8 षटकार आणि 6 चौकार लगावले. तसेच वैभवने 158.73 च्या स्ट्राईक रेटने शतक केलं. वैभवने या शतकी तडाख्यानंतर पुष्पा स्ट्राईल सेलिब्रेशन केलं.
वैभव आणि एरॉन जॉर्ज या सलामी जोडीने भारताला दणदणीत सुरुवात मिळवून दिली. वैभवच्या शतकानंतर या जोडीने 10 धावा जोडल्या. यासह वैभव आणि एरॉन या दोघांची द्विशतकी सलामी भागीदारी झाली. वैभवला या सामन्यात द्विशतकापर्यंत पोहचणं सहज शक्य होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला वैभवला रोखण्यात यश आलं. वैभवला शतकानंतर आणखी 27 धावाच जोडता आल्या. वैभव 127 धावांवर बाद झाला. वैभवने या 127 धावांच्या खेळीत 10 षटकार आणि 9 चौकार लगावले. वैभव आऊट होताच सलामी भागीदारी मोडीत निघाली. वैभव आणि एरॉनने 25.4 ओव्हरमध्ये 227 रन्सची पार्टनरशीप केली आणि भारताला भक्कम अशी सुरुवात मिळवून दिली.
वैभव सूर्यवंशीचं फायर शतक
🚨 HUNDRED FOR VAIBHAV SURYAVANSHI 🚨
– Smashed 100* runs off 63balls vs SA U19.
– With 8 sixes and 6 fours. pic.twitter.com/al1eebWiVu— Sports Culture (@SportsCulture24) January 7, 2026
दरम्यान टीम इंडियाला वैभव सूर्यवंशी याच्या कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियाने या यूथ वनडे सीरिजमधील पहिले 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताला विजयी हॅटट्रिक करत मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 3-0 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवण्याची संधी आहे. आता भारत सलग तिसरा सामना जिंकणार की दक्षिण आफ्रिका मायदेशात लाज राखणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.