AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?

India U19 vs South Africa U19 2nd One Day : अंडर 19 टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे आता भारताला दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला विजयापासून रोखण्याचं आव्हान आहे.

U19 IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
Vaibhav Suryavanshi U19 Team IndiaImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jan 05, 2026 | 2:20 AM
Share

वैभव सूर्यवंशी याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची आणि नववर्षाची सुरुवात विजयाने केली. भारताने यूथ वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर डीएलसनुसार 25 धावांनी मात केली. भारताने यासह 3 सामन्यांच्या मलिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसर्‍या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा करो या मरो असा सामना आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

दुसरा सामना कुठे?

उभयसंघातील दुसरा सामना हा सोमवारी 5 जानेवारीला विलोमूर पार्क बेनोनी इथे होणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजता नाणेफेकीचा कौल लागणार आहे. भारतीय संघाचा हा सामना जिंकून मालिका नावावर करण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच विजयी सुरुवात केल्याने भारताला तिसऱ्या सामन्यातही मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेसाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरावं लागणार आहे.

भारताचा डीएलएसनुसार विजय

उभयसंघातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण झाला नाही. सामन्याचा निकाल हा डीएसनुसार लावण्यात आला.भारताने या सामन्यात 50 ओव्हरमध्ये ऑलआऊट 301 रन्स केल्या. प्रत्त्युतरात दक्षिण आफ्रिकेने 27.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 148 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सामना बरोबरीत सुरु होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. त्यानंतर सामना पुन्हा सुरु झालाच नाही. भारताने अशाप्रकारे हा सामना डीएलनुसार 25 धावांनी जिंकला. पावसामुळे दक्षिण आफ्रिलेला सामना जिंकण्यासाठी पूर्ण संधी मिळालीच नाही

वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष

दरम्यान दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे. नियमित कर्णधार आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशी याला नेतृत्वाची धुरा देण्यात आलीय. भारताने वैभवच्या नेतृत्वात विजयी सलामी दिली. मात्र वैभवला कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. त्यामुळे वैभव दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करुन भारताला विजयासह मालिका जिंकून द्यावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...