IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये

अंडर 19 वनडे वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 6 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आहे. भारताने 252 धावा केल्या आहेत. आता भारतीय गोलंदाज आणि पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई असणार आहे.

IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
IND vs PAK: पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई, 252 धावा इतक्या षटकात केल्या तरच सेमीफायनलमध्ये
Image Credit source: टीव्ही 9 हिंदीवरून
| Updated on: Feb 01, 2026 | 5:28 PM

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीत भारत पाकिस्तान सामन्याची रंगत वाढली आहे. कारण या सामन्यातील दुसऱ्या डावात ट्वीस्ट आला आहे. पाकिस्तानने नाणेफेकीच कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच भारताला 252 धावांवर रोखलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा केल्या. तसेच विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान सोपं वाटतं असलं तरी खेळपट्टी काय फलंदाजीला पूरक नाही. त्यामुळे पाकिस्तानसाठी हे आव्हान खडतर असणार आहे. खरं तर आव्हानापेक्षा हा सामना करो या मरोची लढाई आहे. या सामन्यात विजयी संघ उपांत्य फेरी गाठणार आहे. भारताला विजय मिळाला तर उपांत्य फेरीत पोहोचेल. पण पाकिस्तानसाठी हे गणित सोपं नाही. पाकिस्तानला नुसता विजय मिळवून चालणार नाही. तर त्याला नेट रनरेटचं गणित सोडवावं लागणार आहे.

गट 2 मधून इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ उपांत्य फेरी गाठे. भारताने 3 सामन्यात विजय मिळवून 6 आणि +3.337 नेट रनरेट आहे. तर पाकिस्तानने 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवून 4 गुण आणि नेट रनरेट 1.484 आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजय तर मिळवावा लागेल. तरच सहा गुण होतील. पण भारताचेही सहा गुण असल्याने नेट रनरेटचं गणित सोडवाणं भाग आहे. पाकिस्तानला यासाठी भारताने विजयासाठी दिलेले 253 धावांचं आव्हान 33.3 षटकात पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज आणि पाकिस्तानी फलंदाज यांचा कस लागणार आहे.

भारताने हा सामना जिंकला तर थेट गट 2 मध्ये पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी लढत होईल. पण हा सामना गमावला आणि पाकिस्तानपेक्षा नेट रनरेट चांगला असेल तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत होईल. त्यामुळे भारत उपांत्य कोणाशी लढत करणार हे देखील या सामन्यात ठरेल. दुसरीकडे, पाकिस्ताननं हे आव्हान 30 षटकात पूर्ण केलं तरी दुसऱ्या स्थानावर राहील. पाकिस्तानला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागेल.